व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Congress protest went wrong : सरकारवर आसूड, पण कचोरीवर प्रेम! काँग्रेसच्या आंदोलनापेक्षा...

Congress protest went wrong : सरकारवर आसूड, पण कचोरीवर प्रेम! काँग्रेसच्या आंदोलनापेक्षा नाश्त्याचीच चर्चा

Kachori gets attraction over congress’s protest : सरकारविरोधी घोषणांवर कचोरी भारी; मोर्चानंतर कार्यकर्ते तुटून पडले

Buldhana काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ harshwardhan sapkal यांच्या नेतृत्वाखाली नुकताच बुलढाण्यात ‘आसूड मोर्चा’ पार पडला. शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा यशस्वी झाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला असला, तरी राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो मोर्चानंतर वाटण्यात आलेली कचोरी.

मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी कचोरीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नाश्त्याच्या पॅकेट्सचे वितरण सुरू होताच अनेकांनी त्यावर अक्षरशः झडप घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही ठिकाणी पॅकेट मिळवण्यासाठी धावपळ आणि किरकोळ धक्काबुक्की झाल्याचेही उपस्थितांकडून सांगितले जात आहे.

Khamgao – jalna railway : रेल्वे अजून रुळावर नाही, पण श्रेयाची गाडी सुपरफास्ट!

विशेष म्हणजे, मोर्च्यानंतर सरकारविरोधातील घोषणांपेक्षा “कचोरी मिळाली का?”, “किती मिळाली?” आणि “कोणाला मिळाली नाही?” याच चर्चांना अधिक उधाण आल्याचे दिसून आले. त्यामुळे आंदोलनातून दिलेला राजकीय संदेश मागे पडला की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप होतोय; संजय गायकवाडांचा अब्दुल सत्तारांच्या सुरात सूर

मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर टीकेची झोड उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी कार्यकर्त्यांमधील कचोरीच्या चर्चेने संपूर्ण कार्यक्रमालाच वेगळे वळण दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काही राजकीय निरीक्षकांनी तर मिश्कील शब्दांत “आसूड मोर्च्यापेक्षा कचोरीच अधिक गाजली,” अशी टिप्पणी केली आहे.
परिणामी, सरकारविरोधातील आक्रमक भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांपेक्षा मोर्चानंतरचा नाश्ता आणि त्याभोवतीचा गोंधळच सध्या जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

error: Content is protected !!