Local Body Elections : ५९ गटांसाठी आरक्षण सोडत; महिलांसाठी अर्ध्या जागा राखीव

Reservation Draw Held for Amravati Zilla Parishad : अनु. जाती ११, अनु. जमाती १२, मागास प्रवर्ग १५, सर्वसाधारण २१ गट निश्चित

Amravati जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आरक्षण सोडत सोमवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काढण्यात आली. या सोडतीत ३० गट महिलांसाठी राखीव ठरल्याने यंदा “मिनी मंत्रालयात महिलाराज” असल्याचे चित्र दिसले.

सोडतीनुसार — अनुसूचित जाती प्रवर्गात ११ गट, अनुसूचित जमाती प्रवर्गात १२, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गात १५ आणि सर्वसाधारण प्रवर्गात २१ गट निश्चित झाले आहेत. त्यामुळे काही अनुभवी नेत्यांना जागा गमवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून काही जण सुरक्षित ठरले आहेत.

ग्रामविकास विभागाने २० ऑगस्ट २०२५ रोजी गटांच्या आरक्षणाचे धोरण निश्चित केले होते. यावर काही याचिका न्यायालयात दाखल झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा विषय शासन व आयोगाकडे सोपविला होता. शासनाकडून नवीन निर्देश न आल्याने विद्यमान अधिसूचनेनुसारच आजची आरक्षण सोडत घेण्यात आली.

Rajendra Shingne : शिंगणे म्हणतात, ‘काँग्रेसविषयी शंका, पण महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही’

सोडतीपूर्वी प्रवर्गानुसार गटांची माहिती सर्व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी महिला राखीव गटांसाठी चिठ्ठ्या जय संदीप गायकी या आठ वर्षीय बालकाच्या हस्ते काढण्यात आल्या. जिल्हा परिषद गटांची सोडत संपल्यानंतर याच सभागृहात १४ पंचायत समिती सभापती पदांसाठीही आरक्षण जाहीर करण्यात आले.

पंचायत समिती सभापती आरक्षण
तालुका प्रवर्ग
नांदगाव खंडेश्वर अनुसूचित जाती
अंजनगाव सुर्जी अनुसूचित जाती (स्त्री)
अमरावती अनुसूचित जाती (स्त्री)
वरुड अनुसूचित जमाती
चांदूरबाजार मागासवर्ग
दर्यापूर मागासवर्ग
धामणगाव मागासवर्ग (स्त्री)
तिवसा मागासवर्ग (स्त्री)
चांदूर रेल्वे सर्वसाधारण
अचलपूर सर्वसाधारण
भातकुली सर्वसाधारण (स्त्री)
मोर्शी सर्वसाधारण (स्त्री)
धारणी अनुसूचित जमाती
चिखलदरा अनुसूचित जमाती (स्त्री)
जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण

अनुसूचित जाती :
खल्लार (स्त्री), आसरा, थिलोरी (स्त्री), भंडारज (स्त्री), पिंपळोद, सातेगाव, घुईखेड, येवदा (स्त्री), आसेगाव (स्त्री), लोणी, खारतळेगाव (स्त्री).

अनुसूचित जमाती :
टिटंबा, सावलीखेडा, तलई (स्त्री), बैरागड, चुरणी, कलमखार (स्त्री), काटकुंभ (स्त्री), टेंब्रुसोंडा (स्त्री), जामली (स्त्री), धामणगाव गढी (स्त्री), बेनोडा, पुसला.

Local Body Elections : काँग्रेस सज्ज, भाजपचा खेळ अजूनही गुलदस्त्यात!

नागरिकांचा मागासवर्ग :
कापूसतळणी (स्त्री), धोतरखेडा (स्त्री), शिंदी (बु.) (स्त्री), पिंपळखुटा मोठा, अंबाडा, नेरपिंगळाई (स्त्री), जरुड, लोणी (स्त्री), तळेगाव ठाकूर, पुसदा, अंजनगाव बारी, मंगरूळ चव्हाळा, जुना धामणगाव (स्त्री), मंगरूळ दस्तगीर (स्त्री), तळेगाव दशासर (स्त्री).

सर्वसाधारण प्रवर्ग :
कांडली (स्त्री), पथ्रोट, असदपूर, करजगाव, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, कुऱ्हा (स्त्री), शिरजगाव बंड, हिवरखेड (स्त्री), रिद्धपूर, आमनेर, वऱ्हा, शिराळा, नांदगाव पेठ (स्त्री), वलगाव (स्त्री), खोलापूर (स्त्री), माहुली चोर, वाढोणा रामनाथ (स्त्री), आमला विश्वेश्वर (स्त्री), चिंचोली (स्त्री).

१७ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप सादर करण्याची मुदत

गट व पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणावरील आक्षेप किंवा हरकती १७ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील. जिल्हा परिषद गटांसाठी आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समित्यांसाठी संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत.