Electronics goods taken on finance of 22 Lakhs, looted in Nagpur : डॉली आणि तिच्या साथीदार फरार
Nagpur नागपूर जिल्ह्यातील जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात, एका महिला ठगबाजाने फायनान्सवर वस्तू घेऊन अकरा महिलांची तब्बल २२ लाख ४८ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
भंडार मोहल्ला, इंदोरा येथील रहिवासी डॉली उर्फ सालवनकर (३६) ही महिला दोन मुलांसह राहते. तिचा पती तिच्यापासून वेगळा राहतो. दोन वर्षांपूर्वी ती इंदोरा परिसरात किरायाने राहायला आली होती. ती कुठलाच कामधंदा करीत नाही. परंतु जवळपासच्या लोकांना मोठमोठ्या थापा मारत त्यांची फसवणूक करण्यात ती निपुण आहे.
Prataprao Jadhav : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणार !
डॉलीने गरजू किंवा अडचणीत असलेल्या महिलांना मदत देण्याची बतावणी करून त्यांची फसवणूक केली. फिर्यादी सभ्यता गणवीर (४०) यांना मोबाईल खरेदी करायचा होता. तेव्हा डॉलीने त्यांना मदतीचे आश्वासन दिले. तिने सांगितले की दुकानदार तिच्या ओळखीचे आहेत. फायनान्सवर वस्तू मिळवून देतील. आधार कार्ड व इतर ओळखपत्राच्या आधारे कर्जावर वस्तू घेतल्या. परंतु घेतलेली वस्तू फिर्यादीला न देता स्वतःकडे ठेवून घेतली आणि नंतर त्या वस्तूची परस्पर विक्री केली.
या प्रकारची फसवणूक करण्यात डॉलीला तिचा साथीदार गौरव आमदने मदत करत होता. त्यांनी शहरातील जवळपास अकरा महिलांची २२ लाख ४८ हजार रुपयांनी फसवणूक केली. फिर्यादी महिलेनी वस्तू परत मागीतली असता डॉलीने उडवा उडवीची उत्तरे देवून वेळ मारून नेत होती. त्यानंतर धनादेश दिला, परंतु बँकेत धनादेश वटलाच नाही.
Santosh Deshmukh murder case : संताेष देशमुख यांच्या मुलाच्या उपस्थितीत मूक माेर्चा
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जरीपटका पोलिस ठाण्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि आरोपींना शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.