Local Body Elections : सभापतीपद एसटीसाठी राखीव, पण सदस्यांमध्ये एकही एसटी जागा नाही!

Sabhapati Post Reserved for ST, But No ST Member Among the Representatives : चिखली पंचायत समितीत आरक्षणाचा घोळ, पक्षांसमोर नवा राजकीय पेच

Chikhali जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडतीनंतर चिखली तालुक्यात राजकीय चर्चा चांगलीच पेटली आहे. पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले असले, तरी समितीच्या १४ गणांपैकी एकाही जागेवर एसटी आरक्षण नाही. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष आणि इच्छुक नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

चिखली पंचायत समितीच्या १४ निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, ओबीसी आणि सर्वसाधारण गटांना आरक्षण मिळाले असले, तरी अनुसूचित जमातीसाठी एकही सदस्यपद राखीव नाही. तरीदेखील, सभापतीपदावर दावा करायचा असेल तर खुल्या गटातून एसटी उमेदवार निवडून आणणे भाग पडणार आहे. राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हे आव्हानात्मक ठरणार असून, एसटी उमेदवाराला खुल्या प्रवर्गातून जिंकवणे हा पक्षांसाठी ‘टास्क’ ठरणार आहे.

Chandrashekhar Bawankule : धाड आणि धामणगाव बढे होणार नवे स्वतंत्र तालुके?

गटवार आरक्षणाचा तपशील
गणाचे नाव आरक्षण प्रकार
करवंड सर्वसाधारण महिला
उदयनगर खुला
अमडापूर सर्वसाधारण महिला
कव्हळा अनुसूचित जाती
इसोली नामांतरित प्रवर्ग महिला
मंगरुळ नवघरे सर्वसाधारण महिला
शेलूद खुला
सवणा नामांतरित प्रवर्ग महिला
केळवद खुला
गोदरी नामांतरित प्रवर्ग
शेळगाव आटोळ खुला
मेरा खुर्द खुला
कोलारा अनुसूचित जाती महिला
मेरा बु. अनुसूचित जाती महिला

सभापतीपद एसटी प्रवर्गासाठी राखीव असल्याने, आता खुल्या गटातून एसटी उमेदवार शोधून तो जिंकवणे हे मोठे राजकीय समीकरण ठरणार आहे. जर असा उमेदवार निवडून आला नाही, तर सभापतीपदाच्या आरक्षणात बदल करण्याची वेळ येऊ शकते, असे प्रशासनिक सूत्रांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार संतोष काकडे आणि जी.जी. कडू यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

महिला आरक्षण लागू झाल्यामुळे अनेक पुरुष नेते आता आपल्या पत्नींना उमेदवार म्हणून पुढे करताना दिसत आहेत. राजकारणाचा ‘र’ माहित नसलेल्या महिलांचे बॅनर-पोस्टर सोशल मीडियावर झळकू लागले असून, ‘आरक्षण मिळतंय तर घरातून उमेदवार उभा करा’ अशी मानसिकता स्पष्ट दिसतेय.

Mahavikas Aghadi : ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट आर्थिक मदत द्या!

या अनोख्या आरक्षणामुळे चिखली पंचायत समिती राजकीय प्रयोगशाळा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना गट यांच्यात उमेदवार शोधाची शर्यत सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत सभापतीपदाच्या रिंगणात कोण उतरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.