Chandrashekhar Bawankule Sanjay Khodke : नेमकं खोटं कोण बोलतंय? पालकमंत्री की आमदार?

Will BJP ask for Apology to Khodke Couple? Congress Questions : काँग्रेसचा सवाल; खोडके दाम्पत्याकडून भाजप माफीनामा घेणार का?

Amravati पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहरू मैदानावर कोणतेही बांधकाम होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे, आमदार खोडके दाम्पत्याने पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार नेहरू मैदानाचा विकास होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नेमकं खोटं कोण बोलतंय — पालकमंत्री की आमदार? याचा खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच पालकमंत्री बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख करून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल भाजपने खोडके दाम्पत्याकडून माफीनामा घ्यावा, अशी मागणीही काँग्रेसने केली.

नेहरू मैदान हा अमरावतीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. देश-राज्य स्तरावरील अनेक नेत्यांच्या सभांना या मैदानाने साक्षी दिली आहे. अशा ऐतिहासिक जागेचे जतन करण्याऐवजी आमदार खोडके दाम्पत्य ते विकण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

AgriStack Scheme : जिल्ह्यातील एक लाख शेतकरी पीएम किसानच्या लाभाला मुकणार?

“पंडित नेहरूंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मैदानाची जागा बिल्डर्सना देण्याचा घाट घातला जातोय,” अशी टीका माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि विलास इंगोले यांनी केली. “अमरावती हे व्यापाऱ्यांचे शहर होते; आता शहराचाच व्यापार होत आहे,” असे म्हणत शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी इशारा दिला की, “हे षडयंत्र काँग्रेस हाणून पाडेल.”

Local Body Elections : जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षणाने उलथापालथ; अनेक दिग्गजांवर गट बदलण्याची वेळ

त्यांनी पुढे सांगितले की, “३ वर्षांपासून बंद असलेले टाऊन हॉल काँग्रेसने आंदोलन करून सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, जतन व दुरुस्ती न करता या वास्तू उपेक्षित ठेवून कालांतराने पाडून बिल्डर्सकडे देण्याचा प्रकार सुरू आहे.”