व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काळी दिवाळी आंदोलन

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काळी दिवाळी आंदोलन

Protest Against the Mahayuti Government’s Agriculture Package : शेतकऱ्यांना थेट मदत द्या; महायुती सरकारच्या कृषी पॅकेजचा निषेध

Akola महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि राज्य सरकारच्या कथित खोट्या कृषी पॅकेजच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (शरद पवार गट) अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आणि महानगराध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५० हजार रुपये थेट आर्थिक मदत द्यावी, विहिरी, पशुधन आणि घरांसाठी स्वतंत्र मदत द्यावी, सर्वमान्य कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी, तसेच पीकविमा ‘ट्रिगर’ पुन्हा सुरू करून प्रत्यक्ष नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

Food and drugs supply department : दिवाळीच्या तोंडावर निकृष्ट तांदूळ, गरीबांची थट्टा

कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण केले आणि “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष शामबाबू अवस्थी, ज्येष्ठ नेते प्रा. विश्वनाथ कांबळे, डॉ. आशा मिरगे, संघटन सचिव जावेद जकारिया, जिल्हा महासचिव आनंद वानखडे, कार्याध्यक्ष सैय्यद युसूफ अली, देवा ताले, विशाल गावंडे, गणेश राऊत, अजय पागृत, सतीश गावंडे, किरण ठाकरे, कैलास गोंडचवर, श्रेयस चौधरी, मर्दाने, राम कोरडे, मेहमूद खान पठाण, पापाचंद पवार, ॲड. संदीप तायडे, बाबासाहेब घुमरे, शौकत अली, मोहम्मद साफिक उर्फ पप्पू भाई, अल्ताफ खान, चंदू भाई चांदखां, मेहबूब भाई मंटूवाले, मिलिंद गवई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!