Devendra Fadanvis : ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ मिळेल !

Empowering OBC Students: A Step Toward Inclusive Progress : महाज्योतीच्या सात मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

Nagpur : इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे होतकरू, नवीन पिढी आकारास येईल आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल. कारण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आकारास आले आहे. येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपुरातील सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन काल (१९ ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मीती केली आहे आणि त्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध केला आहे.

Local Body Elections : नेत्यांच्या मागे फिरणाऱ्याला तिकीट नाही, बावनकुळेंनी सुनावले !

व्यासपीठावर महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याणं मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar : उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज ओबीसी मुलांसाठी ६० पेक्षा जास्त वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन मुले विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करीत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलेअर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.