cabinet meeting : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारांवर उपचार

21 important decisions of various departments in the cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागाचे 21 महत्त्वाचे निर्णय

Mumbai : राज्यातील नागरिकांसाठी आजची कॅबिनेट बैठक ऐतिहासिक ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत तब्बल 21 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यात आरोग्य, शिक्षण, प्रशासन आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. मात्र, सर्वाधिक चर्चेत राहिलेला निर्णय म्हणजे – महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठा विस्तार.

सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता तब्बल 2400 आजारांसाठी उपचारांना मान्यता देण्यात आली आहे. यातील 2399 आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील, तर गंभीर आणि खर्चिक आजारांसाठी आता 10 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च शासन उचलणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रुग्णांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात हलका होईल आणि खासगी रुग्णालयांनाही दिलासा मिळणार आहे.

Khamgao APMC : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता संघर्ष तापला!

मात्र, आजच्या कॅबिनेटमध्ये केवळ निर्णयच नव्हे तर जोरदार खडाजंगीही झाली. अनेक मंत्र्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत पोहोचत नसल्याबद्दल काही मंत्र्यांनी थेट नाराजी दाखवली. केवळ मराठवाडा नव्हे, तर कोकणातील भात पिकांनाही मोठं नुकसान झाल्याचं निदर्शनास आणून देत तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. मागील बैठकीतही अशाच तक्रारी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, विलंब सहन केला जाणार नाही.

आरोग्य विभागाच्या इतर निर्णयांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित पदांवर समायोजित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्यांनी 10 वर्षांची सेवा पूर्ण केली आहे, त्यांना एकवेळच्या लाभाच्या स्वरूपात ही संधी दिली जाणार आहे. यासोबतच ग्रामविकास विभागामार्फत आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Local Body Elections : मतदारयादीचा टप्पा पूर्ण; जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीची उलटी गणती सुरू!

शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे 300 प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय तंत्रनिकेतन सुरू होणार आहे. त्यासाठी 39 शिक्षक आणि 42 शिक्षकेतर पदांना मंजुरी देण्यात आली आहे. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापकांची 5 पदे निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली.

नगरविकास विभागाच्या निर्णयांत वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकाला तो भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांनाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

Local Body Elections : शिवसेनेची तयारी जोरात, मेहकरमध्ये ‘शिवसंकल्प’!

बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आरोग्य आणि शिक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. “महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील वाढीव मदतीमुळे लाखो रुग्णांना नवसंजीवनी मिळेल. शासन नागरिकांच्या पाठीशी ठाम उभं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

______