Municipal Corporation : गडकरींच्या फटकारणीनंतर मनपाची धावपळ, आयुक्तांनी कचरा कंपन्यांना दौडवले !

Municipal Corporation rushes after Nitin Gadkari’s reprimand, Commissioner rushes garbage companies : ऐन दिवाळीत शहरात साचले कचऱ्याचे ढिगारे, नागरिक त्रस्त

Nagpur : नागपूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. ऐन दिवाळीत शहराच्या प्रमुख रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्लीबोळांपर्यंत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागपूरकरांचा संताप वाढला होता. या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच मनपाच्या निष्क्रीय कारभारवर सडकून टीका केली. त्यांनी फटकारल्यानंतर आता नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना एक महिन्याच्या आत सुधारणा आराखडा लेखी स्वरुपात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेने शहरातील झोन क्रमांक एक ते पाच या भागात ए.जी. एनव्हायरो आणि झोन क्रमांक सहा ते १० या भागात बीव्हीजी कंपनीला कचरा संकलन, वाहतूक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे. मात्र दोन्ही कंपन्यांच्या कामगिरीबद्दल नागरिकांचा असंतोष वाढत चालला आहे. मुख्य रस्त्यांवर काही प्रमाणात स्वच्छता केली जाते. पण बहुतेक अंतर्गत रस्ते, गल्ल्या आणि काही बाजारपेठा अजूनही घाणीने बरबटलेल्या आहेत, हे वास्तव आहे.

Doctor suicide case in Phaltan : मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टरही संपावर, ओपीडीसमोर लांबच लांब रांगा !

अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याने तो कुजून दुर्गंधी पसरत आहे. तर काही भागांत कचरा जाळल्याने प्रदूषणात भर पडत आहे. या पार्श्र्वभूमीवर गडकरींनी अधिकाऱ्यांना झापत नागपूरला स्मार्ट सीटी बनवायचे की कचऱ्यात बुडवायचे, असा सवाल केला होता. या टीकेनंतर मनपा प्रशासनाने कडक भूमिका घेत कंपन्यांकडून तातडीने कार्ययोजना मागवली आहे. आयुक्त चौधरी यांनी दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू कराव्या, अन्यथा मनपा प्रशासन दंडात्मक कारवाई करेल. नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

cabinet meeting : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारांवर उपचार

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी पाळण्यात कंपन्यांचा कुचराईचा प्रकार उघड झाला आहे. पुढील काही आठवड्यांत सुधारणा दिसली नाही, तर करार रद्द करण्याचा पर्यायही प्रशासनाच्या विचाराधीन आहे, असे सूत्रांनी सांगितले. नागपूरसारख्या स्मार्ट सीटीत कचऱ्याचे ढिगारे दिसणे ही बाब लज्जास्पद असल्याची नागपूरकरांची भावना झाली आहे. आता गडकरींनी फटकारल्यानंतर प्रशासन जागे झाले खरे. पण त्याचा परिणाम दिसला पाहिजे, अशी नागपूरकरांची अपेक्षा आहे.