Local Body Elections : निवडणुकीचा ज्वर चढतोय, इच्छुकांची कागदपत्रांसाठी धावपळ !

Election fever is rising, aspirants are rushing for documents : कर भरण्यासाठी लागताहेत रांगा, बँकांमध्येही होतेय गर्दी

Nagpur : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. कर भरण्यासाठी आणि निवडणूक खर्चासाठी खाते उघडण्याकरता बँकांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

नगरपरिषदांच्या विविध प्रभागांमधून उमेदवारी दाखल करायचीआहे म्हणून इच्छुकांनी थकीत भर करण्यासाठी महापालिका आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रांगा लावल्या आहेत. नियमानुसार उमेदवाराची कर थकबाकी नसणे आवश्यक आहे. अनेकांना निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वीच हे थकबाकीचे प्रश्न निकाली काढावी लागत आहेत. दरम्यान निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याची आवश्यकता असल्याने स्थानिक बँकांमध्येही इच्छुकांची गर्दी बघायला मिळत आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाचे व्यवहार या खात्यातूनच करावे लागणार आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून ओळखपत्र, कर पावती आणि आवश्यक कागदपत्रांची जुळवाजवळ सुरू आहे.

Zero Mile : झिरो माईल विकास प्रकल्पाला केंद्राची साथ समन्वयासाठी नेमले दोन वरिष्ठ अधिकारी

आरक्षणामुळे बदलली समीकरणे..
काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षणात फेरबदल झाला. त्यामुळे काही इच्छुकांची राजकीय गणिते कोलमडली आहेत. काही प्रभागांमध्ये अनपेक्षितपणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने इच्छुक उमेदवार आता सुरक्षित आणि खुल्या प्रभागांचा शोध घेत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षांतर्गत चाचपणी आणि स्थानिक नेत्यांची सल्ला मसलत सुरू झाली आहे.

राजकीय दालनात हालचाली वेगवान..
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शिवसेना आणि मनसे यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्जाचा पाऊस पडला आहे. काही वजनदार नेत्यांच्या घरी इच्छुकांनी भेटीगाठी वाढवल्या आहेत. तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांचे उंबरठा शिजवणे सुरू आहे.

Local Body Elections : चाचपणी अंतिम टप्प्यात, 17 नोव्हेंबरला स्पष्ट होणार महायुतीचे चित्र !

स्थानिक पातळीवर वाढली चुरस..
या सर्व हालचालींमुळे स्थानिक पातळीवर राजकीय तापमान वाढले आहे. प्रभागातील समाज घटक वॉर्ड संघटना आणि स्थानिक संघटनांनी आपापले उमेदवार ठरवण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. कागदपत्रे, प्रचार निधी आणि पक्षाकडून तिकीट या तिहेरी शर्यतीत इच्छुक उमेदवारांचा कस लागतो आहे.