Amol Mitkari : “हकालपट्टी नाही, अजित दादांचा कार्यकर्ता असणेच माझं पद”

My Only Position Is Being a Loyal Worker of Ajit Pawar : प्रवक्त्यांच्या यादीतून वगळल्यानंतर अमोल मिटकरींनी सावरले

Akola अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली. या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची नावे वगळल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला. काही माध्यमांनी दोघांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्याचे वृत्त दिले. अखेर अमोल मिटकरी यांनी यावर प्रथमच प्रतिक्रिया देत हकालपट्टीच्या चर्चांना उत्तर दिले आहे.

मिटकरी म्हणाले, “‘हकालपट्टी’ आणि ‘उचलबांगडी’ हे शब्द माध्यमांनी चवीने लावले आहेत. पक्षाकडून मला कोणतेही पत्र आलेले नाही. आज अजित दादांच्या विचाराचा प्रचारक असणे हेच माझे सर्वोच्च पद आहे. अजित दादांचा कार्यकर्ता असण्यासाठी नशिब लागते आणि ते नशिब माझ्याकडे आहे.”

Akola Airport : अकोला विमानतळाचे ‘टेकऑफ’, विशेषाधिकार समितीचा निर्णय

नव्या यादीतून वगळल्यानंतर मिटकरी यांनी सोशल मीडियावरून ‘प्रवक्ता’ हा उल्लेख बायोमधून हटवला. सध्या त्यांच्या प्रोफाइलवर फक्त ‘सदस्य, विधान परिषद सभागृह’ असा उल्लेख आहे. त्यांनी दोन ओळींच्या शायरीतून आपली भावना व्यक्त केली. “दुनिया दौडनेवालों की है, लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है’, या शायरीतून सावरण्याचा प्रयत्न केला.

Weather update : विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी !

अमोल मिटकरी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. तथापि, त्यांच्या काही टोकाच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अलीकडे त्यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जातपडताळणीबाबत ट्विट केले होते, जे नंतर डिलीट करावे लागले. त्याआधी पार्थ पवार यांना पाठिंबा दर्शवणारे ट्विट केल्यानेही पक्षात अस्वस्थता वाढली होती. त्यामुळेच मिटकरींना तूर्त प्रवक्तेपदापासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे सांगितले जात आहे.