Delhi Blast Case : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई;

Teacher in Mumbra detained, house in Kurla also raided : मुंब्रातील शिक्षक ताब्यात, कुर्ला येथील घरावरही छापा

Mumbai : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या स्फोटाचे धागेदोरे जम्मू-काश्मीरपासून थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मोठी कारवाई करत एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

एटीएसने मुंब्रा कौसा परिसरात राहणाऱ्या शिक्षक इब्राहिम आबिदीच्या घरी छापा टाकून तपास सुरू केला. आबिदी हा त्या परिसरात भाड्याने राहत असून, दर रविवारी तो कुर्ल्यातील एका मस्जिदमध्ये उर्दू शिकवण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएसला संशय आहे की, हा शिक्षक काही तरुणांना दहशतवादी विचारांकडे प्रवृत्त करत होता.

पुण्यात अटक झालेल्या काही आरोपींच्या चौकशी दरम्यान इब्राहिम आबिदीचे नाव समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली. एटीएस पथकाने मुंब्रातील त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर, त्याला कुर्ल्यातील दुसऱ्या निवासस्थानी नेण्यात आले आणि तिथेही शोधमोहीम राबवण्यात आली. एटीएसकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, आणि इतर संगणक उपकरणे जप्त करण्यात आली असून त्यांचे ॲनालिसिस करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Student agitation : ‘उठ दोस्ता उगार मुठ – तुझ्या शिक्षणाची तूच थांबव लूट’, उद्या विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा !

माहितीनुसार, आबिदीची दुसरी पत्नी कुर्ल्यात राहत असून, तिच्या घरीही छापेमारी करण्यात आली. या कारवाईनंतर मुंब्रा आणि कुर्ला परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यात याआधीच अल-कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट (AQIS) संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार केल्याच्या आरोपावरून सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंधित तपासातच इब्राहिम आबिदीचे नाव समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Municipal Corporation Election : अनेकांना बसला सोडतीचा फटका, दिग्गज नेते हादरले !

दिल्ली स्फोटानंतर देशभरात दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. मुंब्रातील शिक्षकाच्या ताब्यामुळे महाराष्ट्र एटीएसच्या तपासाची दिशा आता अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे.