Again, date by date, now the next hearing is on January 21st : पुन्हा तारीख पे तारीख, आता पुढची सुनावणी 21 जानेवारीला
New Delhi : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरील वाद पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांच्या पुढील सुनावणीसाठी 21 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच, स्थानिक स्वराज्य निवडणुका पार पडल्यानंतरच या वादाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचं जाहीर केलं होतं. या निर्णयाला विरोध करत उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, गेली तीन वर्षं या दोन्ही याचिका प्रलंबितच आहेत.
Knife attack on groom : लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार !
12 नोव्हेंबर रोजी प्राथमिक सुनावणी पार पडली, त्यानंतर आता न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 21 जानेवारी निश्चित केली आहे. त्या दिवशी प्रथम शिवसेना प्रकरणाचा आणि नंतर राष्ट्रवादी प्रकरणाचा युक्तिवाद होणार आहे. दोन्ही पक्षांना आपले मुद्दे मांडण्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. ही सुनावणी सकाळी 11.30 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुरू होईल.
Local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आधीच निर्देश दिले आहेत की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 26 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण कराव्यात. याच पार्श्वभूमीवर सध्या नगरपंचायती आणि नगरपालिका निवडणुका 2 डिसेंबरला होत असून, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अखेरीस महापालिका निवडणुका घेण्यात येतील.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरचा आणि राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावरचा वाद महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा खटला अखेर कधी निकाली लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, पुन्हा पुढील तारखेने “पुन्हा तारीख पे तारीख” अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
______








