व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला...

Local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

Former minister Jaydutt Kshirsagar will soon join Ajit Pawars faction! : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर लवकरच अजित पवार गटात!

Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली असून, काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढती रंगणार आहेत. तर काही ठिकाणी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पक्षांतरालाही मोठा वेग आला असून, अनेक नेते आपल्या पक्षातून बाहेर पडून प्रतिस्पर्धी पक्षात प्रवेश करत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातील आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी शिंदे गट आणि भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आता या मालिकेत आणखी एक मोठं नाव जोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Knife attack on groom : लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार !

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री आणि बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या राजकीय हालचालीमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याचे काम सुरू असून, पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Student agitation : ‘उठ दोस्ता उगार मुठ – तुझ्या शिक्षणाची तूच थांबव लूट’, उद्या विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा !

बीडसह संपूर्ण मराठवाड्यात सध्या हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजातील मतभेदाचे वातावरण निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत ओबीसी समाजातील बडा नेता असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात राजकीय बळकटी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Delhi Blast Case : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई;

दरम्यान, दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांनी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येत युती केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये इतर ठिकाणीही अशी युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल निर्णायक ठरू शकते. जयदत्त क्षीरसागर यांच्या निर्णयाकडे आता बीड आणि मराठवाड्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

_____

error: Content is protected !!