Local Body Elections : अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, ‘युवा स्वाभिमान’ स्वबळावर!

‘Yuva Swabhiman’ Party Decides to Contest Independently : स्थानिक निवडणुकीत राणा दाम्पत्य आमनेसामने येण्याची शक्यता

Amravati राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा हे एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे.
रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

अलीकडेच युवा स्वाभिमान पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपसोबत युती करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या तीव्र आग्रहानंतर रवी राणा यांनी अखेर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राणा दोन दिवसांत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीने डाव टाकला!

रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा या भाजपच्या सहयोगी नेत्या आहेत. युवा स्वाभिमान पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपसोबतची त्यांची युती तुटली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होतील, अशी शक्यता आहे. परिणामी, पती-पत्नींमध्ये थेट राजकीय संघर्ष होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावतीच्या राजकीय आखाड्यात राणा दाम्पत्य एकमेकांविरोधात प्रचार करताना दिसतील का, हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Party symbol controversy : शिवसेना – राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद पुढे ढकलला

रवी राणा यांच्या स्वबळाच्या निर्णयामुळे आणि नवनीत राणा यांच्या भाजपशी असलेल्या संबंधांमुळे अमरावतीतील स्थानिक स्वराज्य निवडणुका अधिकच रंगतदार होणार आहेत. या निर्णयाने फक्त अमरावतीच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही नव्या चर्चा आणि समीकरणांची सुरूवात झाली आहे.