Entrepreneurial Dialogue in Jaipur on the occasion of the centenary of the RSS : संघशताब्दी वर्षानिमित्त जयपुर मध्ये उद्योजक संवाद
Jaypur – Rajasthan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारताच्या बहूविध रचनेचा आणि समन्वयात्मक विचारसरणीचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याची गरज व्यक्त केली. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राजस्थानमधील जयपूर येथे संविधान क्लबमध्ये आयोजित ‘उद्योजक संवाद – नवीन क्षितीचाकडे’ या कार्यक्रमात राजस्थानातील आघाडीच्या उद्योजकांची ते काल (१३ नोव्हेंबर) संवाद साधत होते.
डॉ. भागवत म्हणाले सहकार, शेती आणि उद्योग हे आपल्या विकासाचे पायाभूत दगड आहेत. या तिन्ही क्षेत्रांनी एकत्रितपणे चालल्याशिवाय राष्ट्राची समृद्धी होऊ शकत नाही. देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग आणि शेती यांचे संतुलन साधणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जगात भारतासारखी विविधतेने नटलेली व्यवस्था कुठेही नाही. म्हणूनच जगाला विविधतेचे व्यवस्थापन कसे करावे, हे आपण शिकवले पाहिजे. भारतीय संस्कृतीत विविधता ही संघर्षाचे कारण नाही तर परस्पर सहअस्तित्वाची प्रेरणा असल्याचे डॉ. भागवत यांनी नमूद केले.
Local Body Elections : एकनाथ शिंदे यांनी नागपूर जिल्ह्यासाठी केल्या जबाबदाऱ्या निश्चित !
संघाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय संघाबद्दल मत तयार करण्याची घाई कोणीही करू नये, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. संघ समाजातील सर्व घटकांसोबत समन्वयाच्या भूमिकेत कार्य करतो. समाज हित हेच संघाचे अंतिम ध्येय आहे, असे भागवत म्हणाले. या कार्यक्रमात संघ यात्रा मालिकेची शंभर वर्ष या स्मरणीय टप्प्याचाही उल्लेख त्यांनी केला. विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित असलेल्या या संवादात आत्मनिर्भरतीचे महत्त्व, उद्योग – शेतीची सांगड आणि सहकार चळवळीचे योगदान या मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली.
Internal disputes in Congress : सुनील केदारांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना खुले आव्हान !
सरसंघचालकांनी उद्योजकांना राष्ट्र निर्मितीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. राष्ट्राची अंतिम समृद्धी ही सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनीच साध्य होते, असे सांगत डॉ. भागवत यांनी समाजातील सर्व घटकांना परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे संघाच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांना नवा वेग मिळाला. उद्योजक समुदायातही सकारात्मक प्रतिसाद उमटल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.








