50 victims march led by Congress’s Wasim Khan; Bank accounts of accused frozen : वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ५० पीडितांचा मोर्चा; आरोपींची बँक खाती गोठवली
Nagpur : शहरातील एमएच मोटर्सने ५० ते १०० नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर शहर काँग्रेस समितीचे अल्पसंख्याक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक पीडितांनी डीसीपी राहुल मदने यांची भेट घेऊन विस्तृत निवेदन सादर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत डीसीपींनी तात्काळ कडक पावले उचलत दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
७०% डाउन पेमेंट, ० टक्के व्याजाचे आमिष..
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच मोटर्सने ग्राहकांना ७०% डाउन पेमेंट व ० टक्के व्याजाने वाहन मिळेल, असे सांगितले. नागरिकांनी लाखो रुपयांचा भरणा केला. मात्र कंपनीने १००% वाहन फायनान्स ग्राहकांच्या नावावर करून घेतला. त्यामुळे पीडितांना अपेक्षेपेक्षा दुप्पट हप्त्यांचा बोजा सहन करावा लागत होता. पैसे दिल्यानंतरही कंपनीने वाहनांचे कागदपत्रे आणि प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.
Dr. Mohan Bhagwat : देशाच्या प्रगतीसाठी ‘भारत प्रथम’ आवश्यक !
डीसीपी राहुल मदनेंची कारवाई..
तक्रार ऐकताच डीसीपी मदने यांनी लकडगंज पोलिस ठाण्याच्या पीआयला तत्काळ चौकशीचे आदेश दिले. यानंतर अल्पावधीत दोन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही गुन्हे आयएनएस कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अंतर्गत नोंदवले गेले आहेत.
Maharashtra politics : अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंचा तक्रारींचा पाढा
आरोपींच्या बँक खात्यांवर मोठी कारवाई..
पीडितांचे आर्थिक नुकसान वाढू नये म्हणून डीसीपी मदने यांनी आरोपींची सर्व बँक खाती तत्काळ गोठवण्याचे आदेश दिले. ज्यामुळे पुढील कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ शकणार नाहीत. पीडितांना मोठा दिलासा मिळाला असून ईएमआय भरण्यापासून तात्पुरती सूट मिळाली आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पीडितांना आश्वासन दिले की, कायद्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईएमआय भरावी लागणार नाही. यामुळे फसवणुकीच्या कचाट्यात अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
NMC चे ‘कचऱ्याचे राजकारण’ राष्ट्रवादीचा दणका, मनपा मुख्यालयातच फेकला कचरा !
काँग्रेसची मोठी भूमिका..
वसीम खान यांनी पीडितांना न्याय मिळावा म्हणून सतत पाठपुरावा केला. त्यांनी डीसीपींच्या त्वरित आणि कठोर कारवाईबद्दल सांगितले की, अशा फसवणूक करणाऱ्यांना नागपूरमध्ये जागा नाही. पीडितांचा आवाज आम्ही थांबू देणार नाही. एमएच मोटर्स प्रकरणाने नागपूरमध्ये खळबळ माजली असून पोलिसांकडून पुढील कारवाई अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे.








