Allegations of pressure tactics by ruling party in municipal elections : नगरपालिका निवडणुकांत सत्ताधाऱ्यांच्या दबावतंत्राचे आरोप
Mumbai: राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अनेक नेत्यांच्या नातेवाईकांची बिनविरोध निवड झाल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांचे नातेवाईक कोणत्याही प्रत्यक्ष लढाई शिवाय निवडून आल्याने विरोधकांनी सरकारवर दबावतंत्र वापरल्याचा आरोप केला आहे. स्थानिक पातळीवर पोलिसांवर दबाव टाकून प्रतिस्पर्धी उमेदवारांना माघारी घेण्यास भाग पाडले गेल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये घराणेशाहीची परंपरा वारंवार दिसून येते. विधानसभेत निवडून आलेल्या तब्बल सत्तरच्या आसपास आमदारांचा घराणेशाहीचा वारसा आहे. त्याच धर्तीवर नगरपालिकांच्या निवडणुकीतही नेतेमंडळींच्या मुलांना, पत्नींना आणि इतर नातेवाईकांना उमेदवारी वाटल्याचे दिसते. भाजप नेतृत्व घराणेशाहीला विरोध करणारे असल्याचा दावा करत असले तरी पुणे, नागपूर, जळगाव, धुळे आणि इतर शहरांतील उदाहरणे या दाव्याच्या विरोधात उभी राहत आहेत.
Sudhir Mungantiwar : ५३२ जीवनांना नवा प्रकाश: मुनगंटीवारांचा उपक्रम ठरला सेवाभावाचा दीप !
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग १० (ब) मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे काँग्रेस आणि इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडून आले. माघारीसाठी दबाव आणि दमदाटी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. जळगावच्या जामनेर नगराध्यक्षपदासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही अशाच पद्धतीने बिनविरोध निवड झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि अजित पवार गट यांच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. महाजन यांनी प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून माघारीचा मार्ग काढल्याचा दावा केला जात असला तरी विरोधक यामागे सत्तेचा दबाव असल्याचा आरोप करत आहेत.
Local body election : धक्कादायक प्रकार; 1 कोटीत नगरसेवक पदाचा लिलाव?
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगराध्यक्ष पदावर भाजप मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याने एकतर्फी निवडणूक पार पडली. अर्ज बाद करण्यामागे प्रशासनावर टाकलेल्या दबावाचा आरोप भावसार यांनी केला आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे भाजपच्या घराणेशाहीविरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपालिका निवडणुकांत वाढत चाललेल्या बिनविरोध निवडी आणि त्यांच्या मागील राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा घराणेशाही आणि दबावतंत्र हे दोन मुद्दे अग्रस्थानी येताना दिसत आहेत.\
————————








