Dispute in Shinde group : जागा घेणारा माणूस त्या लायकीचा आहे का?

District Chief Rajendra Janjala makes serious allegations against Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाटांवर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळांचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhaji Nagar : नगरपालिका व महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटातल्या नाराजीतून निर्माण झालेला वाद चव्हाट्यावर आला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री व आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट टीकेची झोड उठवली आहे.

“महापालिकेच्या नियोजनासाठी ज्या बैठका घेतल्या जात आहेत त्या बैठकींमधून मला मुद्दाम दूर ठेवले जात आहे. जागा घेणारा माणूस त्या लायकीचा आहे का हे पाहिलं पाहिजे, फक्त नावलौकिक पाहून जागा देऊ नये,” अशा शब्दांत जंजाळांनी शिरसाटांवर तीव्र आरोप केले.

राजेंद्र जंजाळ यांनी पत्रकारांशी बोलताना, एकनाथ शिंदे यांनी बंड करताना सुरतला गेले तेव्हा त्यांच्या हातात कोणते पद येईल हे कुणालाच माहित नव्हते, परंतु आपण त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलो, अशी आठवण करून दिली. “एकनाथ शिंदे यांनी मला जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली आणि मी केलेल्या कामामुळे पक्षाला यश मिळाले. तरीदेखील आज शिरसाट यांच्या वागण्यामुळे जिल्हा संघटनाप्रमुख पदावर असूनही महत्त्वाच्या बैठकांतून डावलले जात आहे. पक्षात खदखद आहे, अनेक जण बोलत नाहीत पण मी बोलण्याची हिंमत केली,” असे जंजाळ म्हणाले.

Gulabrao Patil on Ajit Pawar : ‘दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नका’!

जंजाळांनी केलेल्या आरोपांमुळे शिंदे सेना राष्ट्रवादी या मैत्रीतील नव्हे तर खुद्द शिंदे गटातील अंतर्गत मतभेद स्पष्टपणे उघड झाले आहेत. ते म्हणाले, “अनेक कार्यकर्ते अन्याय जाणवला की पक्ष सोडून जातात. महापालिका निवडणुकीच्या तयारीतच काही कार्यकर्त्यांनी पक्षाचा निरोप घेतला आहे, आणि शिरसाट यांची वागणूक हे त्यामागचं मुख्य कारण बनत आहे.” पुढे ते म्हणाले, “महापौर नंदकुमार घोडेले हे सतत शिरसाटांसोबत दिसतात. जागा कोणी घेतली हे महत्त्वाचं नाही, जागा घेणारी व्यक्ती त्या लायकीची आहे का हे महत्त्वाचं आहे. मागच्या निवडणुकीत त्यांची पत्नी पडली होती, परंतु आता इतरांची गरज संपली म्हणून त्यांना दूर ठेवले जात आहे. याचा तोटा पक्षाला आणि शिवसैनिकांना होणार आहे.”

OBC Reservation : राज्यात आरक्षणाची 50% मर्यादा लागू झाल्यास ओबीसींचे राजकीय आरक्षण शून्यावर !

जंजाळ यांनी पक्षातील असंतोषाचे गांभीर्य अधोरेखित करत शिरसाटांवर आणखी थेट प्रहार केला. “शिरसाट ज्या पद्धतीने वागत आहेत त्याविषयी मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करू नका अशी शिकवण दिली. राजकारण माझा व्यवसाय नाही, माझं घर त्यावर चालत नाही. जर कधी मला स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करावं लागलं, तर त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन,” असे जंजाळांनी स्पष्टपणे म्हटले.

Department of Education : अनधिकृत शाळेविरोधात शिक्षण विभागाची कारवाई !

निवडणुका तोंडावर असताना शिंदे गटातील ही दरी आणखी वाढणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जंजाळांनी शिरसाटांना खुले आव्हान देत म्हटले, “माझे आरोप खोडून काढण्याची हिंमत असेल तर समोरासमोर चर्चा करा. कोणाला बरोबर बसवायचं हे त्यांचा अधिकार आहे, पण जिल्हाप्रमुखाला संघटनेच्या बैठकींमधून वगळणे हा पक्षाच्या अलिखित नियमांचाही भंग आहे.” या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेत कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून येत असून, महापालिका निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

______