ajit pawar resignation ultimatum anjali damania warning to fadnavis : अन्यथा अमित शहाांकडे धाव; अंजली दमानियांचा फडणवीसांना अल्टिमेटम
Mumbai : पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत 24 तासांच्या आत राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिली की, राजीनामा न दिल्यास त्या थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून या प्रकरणावर मोठा निर्णय होईपर्यंत लढा सुरूच राहील.
अंजली दमानिया यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आरोपांची मालिका पुन्हा तीव्र केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांच्या आत अजित पवारांना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रिपदावरून दूर केले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अन्यथा, “मी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेईन. त्यांनी देशाला ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असे आश्वासन दिले होते, त्यानुसारच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो,” असे त्या म्हणाल्या.
Ajit Pawar : विकासावर भर देत म्हणाले “मी तो शब्द वापरायला नको होता”
दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अमेडिया कंपनीशी संबंधित जमीन व्यवहार केंद्रस्थानी ठेवत गंभीर आरोप केले. या कंपनीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची 99% भागीदारी असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांच्या मते कंपनीने जमीन विकत घेण्यासाठी अर्ज न करता केवळ डेटा सेंटर सुरू करण्यासाठीचा अर्ज दाखवला 40 एकर जमीन 5 वर्षांच्या लीजवर दिल्याचा टर्म शीटचा दावा दिशाभूल करणारा आहे. जमीन खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटीला सूटच नाही, त्यामुळे हा फ्रॉड ठरतो. कंपनी म्हणे फक्त 98 लाखांच्या गुंतवणुकीवर डेटा सेंटर उभारणार ज्यावर दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला.
Dispute in Shinde group : जागा घेणारा माणूस त्या लायकीचा आहे का?
त्यामुळे, जमीन बळकावण्याचा हा थेट प्रयत्न असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आणि दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली. दमानिया म्हणाल्या “कंपनीत 99% भागीदारी पार्थ पवार यांची आहे… मग त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही?” त्यांनी शितल तेजवानी, येवले आणि दिग्विजय पाटील यांनाही तातडीने ताब्यात घेण्याची मागणी केली असून सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सादर केल्याचा दावा केला.
अजित पवारांविरोधातील आरोपांवर राज्याचे लक्ष खिळले आहे. दमानिया यांनी दिलेले 24 तासांचे अल्टिमेटम संपण्याच्या दिशेने असताना, पवार राजीनामा देणार का? सरकार पावले उचलणार का? की प्रकरण केंद्रीय पातळीवर जाईल? याकडे राज्याचे राजकारण आता वळले आहे.
____








