‘Ladki Bahin’ scheme will not be shut down, CM claims : मुख्यमंत्र्यांचा शब्द, कोणतीही योजना बंद पडू देणार नसल्याचा दावा
Chikhli पालिका निवडणुकीत परस्परांवर आरोप-प्रत्यारोप न करता केवळ विकासाचा अजेंडा समोर ठेवण्यासाठी आलो आहे. निंदा-नालस्तीची भाषा न वापरता शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस ब्ल्यूप्रिंट तयार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीतील प्रचारसभेत केले.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ २५ नोव्हेंबर रोजी राजा टॉवर परिसरातील सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Devendra Fadnavis : नवनित राणांना पुन्हा संसदेत जाण्याची इच्छा
फडणवीस म्हणाले की, “चिखलीकरांनी प्रत्येक वेळी भाजपला प्रचंड पाठिंबा दिला. यंदाही हा विश्वास कायम राहील. जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने जिंकणारा उमेदवार चिखलीतूनच असेल.”
राज्यातील सुमारे ५० टक्के जनता चिखलीसारख्या चारशे शहरांमध्ये वास्तव्यास आहे. या शहरांना विकसित शहरांच्या श्रेणीत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाची रूपरेषा तयार असून येत्या काळात या शहरांचे रुपडे आमूलाग्र बदलेल, असे फडणवीस यांनी सभेत सांगितले.
मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची आश्वासने
शहरांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांना प्राधान्य
भुयारी गटार योजना राबविण्याचा मनोदय
झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे
घर बांधणीसाठी अडीच लाख रुपयांची मदत
शहरात छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी
कोणताही विकास निधी थांबणार नाही
जोपर्यंत सरकार आहे, तोपर्यंत लाडकी बहीण, शेतकऱ्यांची मोफत वीज, शेतकरी सन्मान, महात्मा फुले जनआरोग्य यांसारख्या योजना कधीही बंद होणार नाहीत
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही
विरोधकांकडे मुद्देच नाहीत – आमदार श्वेता महाले
या सभेत आमदार श्वेता महाले म्हणाल्या,
“विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्याजोगे मुद्दे राहिलेले नाहीत. म्हणून ते टॅक्सवाढ किंवा अतिक्रमण कारवाईबाबत चुकीची भीती पसरवत आहेत. मात्र हे सर्व दिशाभूल करणारे असून वास्तवाशी काहीही संबंध नाही.”
महाले यांनी पंडितराव देशमुख व सर्व भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी चिखली शहराच्या विकासासाठी भाजपचे एकत्रित व्हिजन स्पष्ट करत गतवर्षांत झालेल्या कामांचा आढावा घेतला आणि विरोधकांवरही जोरदार टीका केली.








