The campaigning momentum stopped, new changes in party strategy : प्रचाराचा जोर थांबला, पक्ष रणनीतीत नव्याने फेरबदल सुरू
Mumbai: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका अनपेक्षितपणे पुढे ढकलल्या गेल्याने प्रचाराचा गतीमान वेग अचानक थांबला आहे. दोन आठवड्यांपासून जोरात चाललेला प्रचार, सभा, रॅली, पदयात्रा अचानक थंडावल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडलेल्या वातावरणाची चर्चा सर्वत्र आहे.
न्यायालयीन कारणास्तव निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या असून आता या 22 नगरपरिषदांमध्ये मतदान 20 डिसेंबरला व मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडणार आहे. अन्य सर्व ठिकाणांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरलाच होणार आहेत.
Sudhir Mungantiwar :मुनगंटीवारांनी धमाकेदार घोषणा करत मुलवासियांना दिला दिलासा
प्रचार संपल्याने सर्व पक्षांनी अंतिम दिवशी सभांचा तडाखेबाज कार्यक्रम आखला होता. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांमुळे प्रचाराचा धुरळा उडाला. परंतु निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने प्रसारासाठीचा उत्साह “पॉज” मोडमध्ये गेला आहे.
अचानक लांबलेल्या निवडणुकांमुळे उमेदवारांना प्रचाराचा खर्च, कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन आणि जनसंपर्क राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. तर काही उमेदवारांसाठी हा वाढीव कालावधी फायदेशीर ठरू शकतो. असे जाणकारांचे मत आहे.
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील 17 नगरपालिकांमधील 38 प्रभागांवर निवडणुकीचा थेट परिणाम झाला आहे.
अर्ज छाननीतील हरकती न्यायालयात गेल्याने प्रक्रिया लांबली, त्यानंतर चिन्हवाटप विलंबित होऊन प्रचारासाठी वेळच कमी शिल्लक राहिल्याचा मुद्दा पुढे आला. त्यानंतरच निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
बारामती – रेणापूर – मंगळवेढा – अनगर – महाबळेश्वर – फलटण – यवतमाळ – वाशिम – घुग्गुस – देवळी – देऊळगावराजा – बाळापूर – वसमत – मुखेड – धर्माबाद – फुलंब्री – अंबरनाथ – कोपरगाव – देवळाली – नेवासा – पाथर्डी या ठिकाणचा निवडणुका पुढे ढकलण्यात आले आहेत.
पक्षांतर्गत समीकरणे, गटबाजी, नाराजी आणि निधी व्यवस्थापन हे सर्व मुद्दे आता पुढच्या 20 दिवसांत मोठे ठरणार आहेत. काही उमेदवारांसाठी हा काळ जनसंपर्क वाढवण्याची संधी, तर काहींसाठी कार्यकर्ते टिकवण्याची धावपळ ठरण्याची चिन्हे आहेत. “या 20 दिवसांत समीकरणे बदलली तर 2 डिसेंबरला होणाऱ्या इतर नगरपरिषदांच्या निकालांचाही मानसिक परिणाम 20 डिसेंबरच्या निवडणुकीवर दिसू शकतो. असेही सांगितले जात आहे.
Local Body Elections : नगराध्यक्षपदाची फायनल मॅच, ‘पॉवर’ प्ले सुरू
जिथे प्रचार शिगेला होता तिथे अचानक शांतता
परंतु स्थानिक पातळीवर घराघर संपर्क पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. काही उमेदवारांनी मात्र लक्ष कमी होऊन मतदान टक्केवारी घटेल अशी भीती व्यक्त केली आहे.
एकूण निवडणुकीची तारीख बदलली असली तरी राजकीय तापमान थंडावण्याऐवजी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
आता येणारे 20 दिवसच निकालाचा खरा सूर ठरवणार आहेत.








