Thrilling match between Mahavikas Aghadi and Mahayuti : प्रचाराचा अंतिम टप्पा; दिग्गजांच्या सभांनी पेटवला माहोल, मतदारांची उत्सुकता शिगेला
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा थरार आता शिगेला पोहोचला आहे. अवघ्या काही तासांत प्रचार मोहिमेचा पडदा खाली येणार आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. २७ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी सुरू असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट, तुफानी आणि निर्णायक लढत रंगणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक वर्तुळात या निवडणुकांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या या नगरपंचायतींमध्ये कोणाचा झेंडा फडकेल, याबाबत राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. ग्रामीण ते शहरी, सामाजिक ते जातीय अशा विविध समीकरणांतून या ठिकाणी चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रचाराचा आजचा दिवस अक्षरशः दिग्गजांची परेड ठरला.
Municipal elections : नगराध्यक्षपदांसह 731 नगरसेवक जागांच्या निवडणुका स्थगित
दोन्ही आघाड्यांनी आपापले नेते मैदानात उतरवून वातावरण आणखी तापवले. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब) गटाचे नेते सभासमारंभांमध्ये शक्तिप्रदर्शन करताना दिसले. तर महायुतीकडून भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दिग्गज नेते मोठ्या प्रमाणात दिवसभर प्रचारात गुंतलेले दिसले.
Raid on office : “ही कार्यकर्त्यांची निवडणूक, आरोप-प्रत्यारोप आमचे नाही”
अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका झडली. विकास कामांपासून ते स्थानिक पातळीवरील तक्रारी, भ्रष्टाचाराचे आरोप, पाणी-रस्ते-नळ यांच्या प्रश्नांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्लाबोल केला गेला. अनेक ठिकाणी लहान-मोठे गट, स्थानिक नेत्यांचे असंतोष, बंडखोरी आणि गुप्त समिकरणेही अधोरेखित झाली. शहर असो किंवा ग्रामीण भाग, मतदारांची उत्सुकता मात्र लक्षवेधी ठरली. सभांना भरभरून आणि चौकाचौकात उमेदवारांची दणदणीत उपस्थिती पाहायला मिळाली.
Raid on office : शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का; शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड
अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली तर काही ठिकाणी जनतेने थेट विकासाच्या आश्वासनांची हमीच मागितली. प्रचार थंडावण्याच्या काउंटडाउनला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ मोहीम वाढवली असून मतदारांना शेवटच्या क्षणापर्यंत आकृष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्याचा राजकीय नकाशा बदलण्याची क्षमता असलेली ही निवडणूक कोणाच्या हातात सत्ता सोपवते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








