Local Body Elections : चिखलदऱ्याच्या निवडणुकीत अकोल्याहून ‘रसद’ पुरवणारा बिल्डर चर्चेत

Builder supplying ‘resources’ from Akola for the Chikhaldara election becomes a topic of discussion : दोन ‘खोक्यांची’ चर्चा?, नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या आर्थिक उलाढालीचा संशय

Amravati राज्यातील सर्वात लहान असलेल्या चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अकोला येथील एका बिल्डरकडून मोठ्या प्रमाणात ‘रसद’ पुरविल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उमेदवारापेक्षा तो बिल्डरच अधिक चर्चेत आला.

चिखलदरा या पर्यटनस्थळावरील नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या आर्थिक उलाढालीची चर्चा झाली. त्यात एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला दोन दिवसांपूर्वी ‘रसद’ पोहोचल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अकोल्यातील हा बिल्डर अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला. चिखलदरा परिसरात या बिल्डरची विविध नावांनी मिळून सुमारे ३०० एकरांहून अधिक शेतीजमीन असल्याचेही बोलले जात आहे.

Vidarbha Farmers : शेतकरी नेत्यांवरील चुकीचे गुन्हे रद्द करा

नगराध्यक्षपदासाठी भाजपचे राजेंद्रसिंह सोमवंशी, काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर, तर प्रहार पक्षाच्या विजया गावंडे हे तीन उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची मानली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलदरा हे विदर्भातील एकमेव पर्यटनस्थळ असल्याने विकासाचा मुद्दा धारणी येथे झालेल्या प्रचारसभेत विशेषतः मांडला होता. बडनेराचे आमदार रवी राणा यांनीदेखील या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले.

Teacher’s Constituency : शिक्षक मतदारसंघात ५,८०६ मतदारांची घट, १८ डिसेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत

अकोल्यातील त्या बिल्डरने दोन ‘खोके’ दोन दिवसांपूर्वी चिखलदरा येथे पाठविल्याची चर्चा चांगलीच रंगली. अचानक थंड हवामानात राजकीय वातावरण मात्र तापले. या घडामोडींनंतर तो बिल्डर निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत पुणे येथे रवाना झाल्याचीही चर्चा आहे.