Cash bomb politics : दानवे पाठोपाठ मनसेच्या देशपांडेचाही ‘कॅश बॉम्ब’

Shinde faction MLA later caught a corrupt official in a dilemma : शिंदे गटाच्या आमदारा नंतर लाचखोर अधिकाऱ्याला कोंडीत पकडलं

 

Mumbai : महाराष्ट्रात आज राजकीय वर्तुळात ‘कॅश बॉम्ब’ चा स्फोट झाला आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा रोकडसह धक्कादायक व्हिडीओ समोर आणल्यानंतर, काही तासातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ उघड करत मोठा खळबळजनक आरोप केला आहे. दोन्ही व्हिडीओ समोर आल्यानं राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून हिवाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड गाजण्याची चिन्हे आहेत.

पत्रकार परिषद घेऊन संदीप देशपांडे यांनी सांगितले की, पीडब्ल्यूडीच्या हाफकीन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतून टक्केवारी स्वीकारताना पकडल्याचा हा व्हिडीओ आहे. निधी प्राप्‍तीपूर्वीच सुमारे 2 लाख 80 हजार रुपये कंत्राटदाराकडून घेतले जात आहेत, असा दावा त्यांनी केला. पूर्वी फक्त काम पूर्ण झाल्यानंतर कमिशन घेतले जात होते, परंतु आता निधी आणणे, वर्क ऑर्डर काढणे आणि अंतिम बिल या तिन्ही टप्प्यांसाठी वेगवेगळ्या टक्केवारीची मागणी केली जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Buldhana zilla parishad : बुलढाण्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर

देशपांडे यांनी पुढे सांगितले की, आज केवळ पहिला व्हिडीओ समोर आणला आहे. पुढील दिवसांत दररोज भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडीओ उघड केले जातील. आज ज्या शाखा अभियंता विनोद धुमाळचा व्हिडीओ प्रसिद्ध केला, त्यानंतर उद्या एका वरिष्ठ अभियंत्याचा व्हिडीओ सार्वजनिक केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. हा व्हिडीओ वरळी पीडब्ल्यूडी शाखेचा असून येथून निवडून गेलेले आमदार आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणीही देशपांडेंनी केली.

Dalvi Cash Video : दानवेंना खासदार सुनील तटकरेंनीच व्हिडीओ पाठवला !

कंत्राटदारांच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, “काम पूर्ण होऊनही पैसे मिळत नाहीत. कंत्राटदारांचे म्हणणे आहे की टक्केवारी भरूनही आत्महत्येची वेळ आली आहे. रोहित आर्यचा एन्काऊंटर देखील याच आर्थिक शोषणातून झाला असावा,” असा गंभीर आरोपही त्यांनी उपस्थित केला.

एकीकडे शिंदे गटाच्या आमदाराचे कॅश व्हिडीओ ठाकरे गटाने उघड केला आणि दुसरीकडे अधिकाऱ्याचा लाचखोरीचा व्हिडीओ मनसेने सार्वजनिक केल्यानंतर राजकीय आघाड्यांवर आरोप- प्रत्यारोपांचा तुफान माजण्याची पूर्ण शक्यता असून हिवाळी अधिवेशनात ‘भ्रष्टाचार’ हा मुख्य मुद्दा ठरणार हे जवळजवळ निश्चित दिसत आहे.
______