Mahavitaran : ‘दिवसा वीज द्या’, वन्यप्राण्यांच्या धोक्याने शेतकरी संतप्त

Farmers demand daytime electricity supply : मागणीसाठी महावितरण कार्यालयात सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन

Chikhli जंगला लगतच्या सोमठाणा, दिवठाणा, पेठ आणि बेलदरी शिवारातील शेतकऱ्यांना रात्री १२ नंतर मिळणाऱ्या कृषी वीजपुरवठ्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. थंडीच्या काळात अस्वल आणि बिबट्याचे वाढते दर्शन तसेच जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी तीव्र केली आहे. मात्र महावितरणकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी शेवटी आक्रमक झाले.

शेतकऱ्यांनी विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात धडक देत मुख्यमंत्री यांनी केलेल्या “दिवसा वीज” आश्वासनाची आठवण करून दिली. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शिवारात जाणे जीवघेणे, अस्वल-बिबट्यांचा उच्छाद; गायी, वासरे, बकऱ्यांची शिकार, शेतकऱ्यांच्या जीवाची कोणालाच पर्वा नाही अशी खंत शेतकऱ्यांनी मांडली.

Local Body Elections : कोण निवडून येणार? सोशल मीडियावरच रंगतेय आकडेमोड

आंदोलनादरम्यान विनायक सरनाईक यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांशी थेट संपर्क साधला. त्यानंतर प्रभारी सहाय्यक अभियंता शिराळे यांनी— वरिष्ठांशी तातडीची चर्चा करूनशेतकरी हिताचा विचार करून वेळापत्रक पुनर्रचनेची तयारी असल्याचे आश्वासन दिले.
महावितरणने अखेर शेतकऱ्यांच्या मागणीचा स्वीकार करत आजपासून सकाळच्या वेळेत वीजपुरवठा सुरू केला आहे. आंदोलनानंतर तातडीने झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Dr. Shashikant Khedekar : रब्बी हंगामावर संकट, सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा

या आंदोलनात विनायक सरनाईक, संतोष शेळके, दत्तात्रय मोरे, विजयसिंग मोरे, गणेश मोरे, औचितराव वाघमारे, सिद्धेश्वर मोरे, धनंजय मोरे, किरण मोरे, विलास वसू, उमेश इंगळे, मंगेश मोरे, ओंकार शेळके, विष्णु शेळके (सरपंच) यांच्यासह असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.