Maharashtra Navnirman Sena : बेकायदेशीररित्या जमीन वर्ग केली, तलाठी संजय चव्हाण निलंबीत

Land was illegally reclassified; Talathi Sanjay Chavan suspended : मनसेच्या पाठपुराव्याला यश, वीसहून अधिक प्रकरणात फेरफार

Sindkhedraja सिंदखेडराजा तालुक्यातील शिवनी टाका येथील गट क्रमांक १६३ मधील वर्ग–२ शेतजमीन कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता वर्ग–१ करण्यात आल्याचा गंभीर घोटाळा उघड झाल्यानंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तलाठी संजय चव्हाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित केले आहे.

सुनिता शेषराव कोरडे यांच्या नावावर बेकायदेशीरपणे वर्ग–१ नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासात ही जमीन मूळ मालक भगवान बाबुराव दाभाडे यांची असल्याचे आणि कोणतीही परवानगी, संमती किंवा प्रक्रिया न पाळता वर्गबदल मंजूर केल्याचे स्पष्ट झाले.हा प्रकार महसूल अधिनियमाचे सरळ उल्लंघन असल्याचे तपास अहवालात नमूद आहे.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या दबावानंतर ग्रामपंचायत बॅकफुटवर!

या प्रकरणासह निमखेड बुटा, सिंदखेडराजा परिसरातील परवानगीशिवाय नोंदी बदलणे, वारस नोंदींची तपासणी न करणे, हेतुपुरस्सर विलंब, वर्ग बदलासाठी बेकायदेशीर मंजूर्या एकूण २० हून अधिक नियमबाह्य फेरफार केल्याचा गंभीर आरोप तपासात निष्पन्न झाला आहे. महसूल अधिनियम १९६६, फेरफार नियम १९७९, तसेच १९२८ च्या परिम तत्त्वांचेही उल्लंघन नोंदवले गेले.

Chikhli APMC : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक विस्कळीतपणा

या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे यांनी विस्तृत पुराव्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली होती. तक्रारीत आर्थिक देवाणघेवाणीचा संशय आणि अधिकृत अधिकारांचा गैरवापर यांचा स्पष्ट उल्लेख होता. मनसेने इशारा दिल्यानंतर प्रशासनावर कारवाईची दबाव वाढला.
“तलाठी संजय चव्हाण यांनी कर्तव्यच्युती, शासन नियमांचे उल्लंघन, हेतुपुरस्सर फेरफार आणि अनधिकृत मंजूर्या केल्या. त्यामुळे निलंबन अपरिहार्य, असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. याआधारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजी तात्काळ निलंबनाचे आदेश जारी केले. ही कारवाई आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.