7 candidates are in the fray; direct contest in Ward 7A : खामगावमध्ये स्थगित निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट
Khamgao नगरपालिकेच्या चार प्रभागांतील स्थगित निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी प्रभाग ७A मधील अपक्ष उमेदवाराच्या माघारीनंतर एकूण ७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
नगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस असतानाच प्रभाग क्रमांक ५A, ७A, ९B आणि १६B मधील निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. जिल्हा व सत्र न्यायालयाने काही उमेदवारांचे अर्ज रद्द केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
यानुसार नव्याने जाहीर कार्यक्रमात ४ ते १० डिसेंबर अर्ज मागे घेण्याचा कालावधी देण्यात आला. यामध्ये प्रभाग ७A मधील अपक्ष सौ. शितल प्रितम माळवंदे यांनी अर्ज मागे घेतल्याने येथे आता काँग्रेसच्या सौ. शारदा विनोद माळवंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)च्या गायत्री निलेश तासतोडे यांच्यात सरळ लढत होणार आहे.
Maharashtra Navnirman Sena : बेकायदेशीररित्या जमीन वर्ग केली, तलाठी संजय चव्हाण निलंबीत
प्रभागनिहाय उमेदवारीचे चित्र
प्रभाग ५A : (३ उमेदवार)
• जांभे शितल गजानन – काँग्रेस
• निलीमा प्रसाद डोरले – कमळ
• विद्याराम बुरंगी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)
प्रभाग ७A : (२ उमेदवार – सरळ लढत)
• सौ. शारदा विनोद माळवंदे – काँग्रेस
• गायत्री निलेश तासतोडे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)
प्रभाग ९B : (२ उमेदवार)
• अहेमद निरुनिसा रियाज – काँग्रेस
• गायत्री सत्यनारायण थानवी – भाजप
प्रभाग १६B : (३ उमेदवार)
• रेखा गणेश जाधव – भाजप
• पुष्पा मोहन ठोंबरे – शिवसेना (शिंदे गट)
• लक्ष्मी घनश्याम सावरकर – काँग्रेस








