Drought threat looms over farmers; ministers direct officials to submit an objective report : एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचा फुंडकरांचा शब्द
Akola पावसातील खंड आणि कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची शासन स्तरावर दखल घेण्यात आली असून, शेतकरी बांधवांना परिपूर्ण मदत मिळवून देण्यात येईल. एकही नुकसानबाधित शेतकरी बांधव वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील कमी पाऊस व पीक स्थिती जाणून मदतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. त्याबाबत मंत्री मंडळ स्तरावरही चर्चा झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश ॲड. फुंडकर यांनी दिले आहेत.
Uddhav balasaheb thackeray : शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; ठाकरे गटाची मागणी
जिल्ह्यातील सर्व पिकांची सद्यस्थिती, पेरणीची वेळ, शेवटचा झालेला पाऊस, पावसातील खंड, जमिनीतील ओलावा तसेच पिकांना उपलब्ध असलेले पाणी याची माहिती घेऊन परिपूर्ण अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
त्याचप्रमाणे, गावांमधील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा व पाण्याची स्थिती याचीही नोंद घेऊन मदतीच्या अनुषंगाने कार्यवाही होणार आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कमी पाऊस आणि पावसातील खंडामुळे ज्या भागांतील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्राप्त अहवालांच्या आधारे शासनाच्या निकषांनुसार आवश्यक ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Vidarbha Farmers : पावसाअभावी पिके संकटात; ‘पालकमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी’
शेतकऱ्यांच्या अडचणींचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील. एकही नुकसानबाधित शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.








