२८० कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकर लोकांच्या सेवेत

Chief Minister Fadnavis congratulated MLA Mungantiwar in a letter : मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे केले आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन

Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून साकारत असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारे २८० कोटी रुपयांचे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय दुर्गम भागातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.

नुकतीच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संमती दर्शवली व त्यानंतर मंजुरी प्रदान केली. त्यानंतर या रुग्णालयाचे अधिकृत नामकरण ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे करण्यात आले.

Maharashtra Police : भरतीतील ‘फसवणूक’ भोवली, न्यायालयाचा दणका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे रुग्णालय आरोग्यसेवेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. ‘चंद्रपूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय कर्करोग रुग्णालय साकारले जात आहे, याचा मला आनंद आहे. मानवसेवा, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रभावी संगम असलेले हे रुग्णालय कर्करुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अद्ययावत आरोग्यसेवा केवळ महानगरांपुरती मर्यादित न राहता ती दुर्गम भागांपर्यंत पोहोचली पाहिजे, या राज्य शासनाच्या भूमिकेला रुग्णालय पूरक आहे.

या रुग्णालयामुळे पूर्व विदर्भातील कर्करुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. राज्य शासन, जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून उभे राहत असलेले हे रुग्णालय हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल, अशी खात्री वाटते.

यानिमित्ताने मुनगंटीवार यांचे तसेच रुग्णालय उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी घटकांचे हार्दिक अभिनंदन. या सुसज्ज रुग्णालयाच्या माध्यमातून येथील डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी रुग्णसेवेचा आदर्श घालून देतील, अशी आशा आहे,’ असे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. मुनगंटीवार यांना पाठवले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांना नवे परिमाण देणारा २८० कोटींचा १४० खाटांचा कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य लोकांसाठी जीवदानाचा नवा आशादायी केंद्रबिंदू ठरणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीतून साकारलेला हा सर्वात मोठा आरोग्य प्रकल्प पूर्वविदर्भासाठी ‘नवजीवनाचा आशादायी प्रकाश’ देणारा ठरणार आहे.

जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्याने २८० कोटी रुपयांत उभारलेले हे भव्य कॅन्सर रुग्णालय आज पूर्णत्वास आले आहे.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ पासून कॅन्सर रुग्णालय स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. १७ एप्रिल २०१८ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि २६ जून २०१८ रोजी शासन निर्णय प्रकाशित झाला. आता आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याच पुढाकारामुळे या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात येणार आहे, हे विशेष.

रुग्णालयाची वैशिष्ट्ये म्हणजे, तळमजला सोडून ४ मजले १,००,००० पेक्षा जास्त चौ. फूट बांधकाम,१४० बेडचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र, Linear Accelerators (२), ब्रेकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे,केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहे.

Shinde vs Thackeray : मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..?

चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राला नवा आयाम देणाऱ्या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मेडिकल कॉलेज, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, नवे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवृद्धी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे यांसह अनेक प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. या सर्व प्रयत्नांचा सर्वोच्च टप्पा म्हणून कॅन्सर रुग्णालयाची उभारणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.