Manikrao Kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम !

Big decision of the District Sessions Court; Ministerial post in trouble again : जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय; मंत्रिपद पुन्हा अडचणीत

 

Mumbai : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद पुन्हा धोक्यात आले असून जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटे यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

माणिकराव कोकाटे हे यापूर्वीही विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. कृषीमंत्री असताना शेतकरी कर्जमाफीबाबत केलेली वक्तव्ये, तसेच विधानमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसल्यामुळे महायुती सरकारवर मोठी टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करत त्यांच्याकडे क्रीडामंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती.

Farmers kidney sold : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा आरोप

दरम्यान, आता क्रीडामंत्री असतानाच त्यांच्यावर न्यायालयीन संकट ओढावले आहे. शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी प्रथमवर्ग न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला होता. या शिक्षेला कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने हा अपील फेटाळून लावत प्रथमवर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी हा निकाल दिला आहे.

ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यातच

या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून कायदेशीर बाबींमुळे त्यांचे मंत्रिपद टिकणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. शिक्षेचा निर्णय कायम राहिल्याने घटनात्मक तरतुदीनुसार मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार पुढे काय भूमिका घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

___