Vanchit Bahujan Aghadi : निवडणूक जाहीर होताच, वंचितने कार्यकारीणी बदलली!

Akola East city executive body declared : अकोला पूर्व महानगर शहर कार्यकारिणी जाहीर

Akola महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच वंचित बहुजन आघाडीने नव्या कार्यकारीणीची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीची अकोला पूर्व महानगर शहर कार्यकारिणी अलीकडेच जाहीर करण्यात आली.
पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वाची मानली जात आहे. नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत निलेश देव यांची अध्यक्षपदी, तर दामोदर जगताप यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत बालमुकुंद भिरड आणि अॅड. संतोष रहाटे यांची ज्येष्ठ सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच विविध भागांतील कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. यामध्ये शोभाताई मुळे, सरलाताई मेश्राम, शोभा शेळके, मनोहर बनसोड, अॅड. नरेंद्र बेलसरे, ज्योती खिलारे, सुवर्णा जाधव, शंकरराव इंगोले, देवानंद खडे, अॅड. प्रदीप रोकडे, बबलू पातोडे, मंगेश बलखंडे, डॉ. गाडगे, निलेश पवार, आशिष सोनोने आणि सुगत तायडे यांचा समावेश आहे.

Sudhir Mungantiwar : महाराष्ट्रातील अव्वल ‘१०० टक्के सौर ग्राम’ म्हणून उथळपेठची ऐतिहासिक नोंद

वंचित बहुजन आघाडीच्या या नव्या कार्यकारिणीमुळे अकोला पूर्व महानगरमध्ये पक्षाची संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करून सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ही कार्यकारिणी महाराष्ट्र प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्या स्वाक्षरीने अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.