‘MaMu’ factor emerging as the focal point of the alliance : BMC निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा हा असू शकतो मास्टर प्लान
Mumbai मुंबईच्या राजकारणात एक मोठा राजकीय स्फोट घडण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील ही संभाव्य आघाडी केवळ राजकीय समीकरण बदलणार नाही, तर मुंबईतील मतदारांच्या मनात नवा उत्साह निर्माण करू शकते.
या आघाडीचा केंद्रबिंदू ठरतोय ‘MaMu’ फॅक्टर. ‘MaMu’ म्हणजे मराठी आणि मुस्लिम मतदारांचे समीकरण आहे. मुंबईतील ७२ वॉर्ड्समध्ये मराठी मतदार निर्णायक ठरतात, तर ४१ वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. या दोन्ही गटांना एकत्र आणून ठाकरे बंधू भाजपाला थेट आव्हान देण्याची योजना आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Local Body Elections : अकोला–बुलढाणा–वाशिममध्ये सत्तासमीकरणे बदलणार?
सध्या ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाबाबतही चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुमारे १२० ते १२५ जागांवर उमेदवार देऊ शकते, तर मनसेला ८० ते ९० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही पक्षांना आपापल्या मतदारसंघात ताकद दाखवण्याची संधी मिळेल. याशिवाय मुंबईत संयुक्त रॅली घेऊन एकतेचा संदेश देण्याची योजना आखली जात आहे.
भाजपाकडून या आघाडीला फारसे महत्त्व दिले जात नसल्याचे भासवले जात असले तरी, भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून ही आघाडी त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकते. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा उचलून भाजपाने गेल्या काही वर्षांत मुंबईत आपली पकड मजबूत केली आहे. मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे मराठी मतदार पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने वळू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Akola Municipal Corporation : २० वर्षांत पाच महिला महापौर; आता नव्या आरक्षणाकडे लक्ष!
उद्धव आणि राज ठाकरे यांची आघाडी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करू शकते, असे जाणकारांचे मत आहे. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे.
‘MaMu’ फॅक्टरमुळे ठाकरे बंधूंचा मास्टर प्लान आता चर्चेत आला आहे. मराठी-मुस्लिम मतदारांचे एकत्रित समीकरण जर प्रत्यक्षात उतरले, तर मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. BMC निवडणुकीत या आघाडीचा परिणाम किती होतो, हे पाहणे आता औत्स्युक्याचे ठरणार आहे. मात्र या समीकरणामुळे राजकीय दिशा बदलण्याची चिन्हे दिसत आहे.








