Local Body Elections : लोणारमध्ये काँग्रेस ठरला सर्वांत मोठा पक्ष

Congress emerges as the largest party in Lonar : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

Lonar लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी यांनी विजय मिळवला असून या निकालामुळे नगरपरिषदेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषदेत एकूण २० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ५, भाजपचा १, अपक्ष ५ तर इतरांमध्ये एमआयएमचा एक सदस्य निवडून आला आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मीरा भूषण मापारी यांनी ६ हजार ४६७ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक १ अ मधून अपक्ष उमेदवार हुमेरा सदफ शेख जमील यांनी ८१३ मते तर १ ब मधून अपक्ष अ. उबेद अ. मुनाफ यांनी ७१० मते मिळवून सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक २ अ मधून एमआयएमच्या शेख नगमा बी शेख जावेद यांनी ७६७ मते तर २ ब मधून शिवसेनेचे शेख मकसुद शेख उस्मान यांनी ५९१ मते मिळवत विजय मिळवला आहे.

 

 

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचा गड कायम, प्रहारचा वरचष्मा

प्रभाग क्रमांक ३ अ मधून काँग्रेसच्या मापारी वर्षा संतोष यांनी ९४० मते तर ३ ब मधून शिवसेनेचे गजानन शालिकराम मापारी यांनी ६९५ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधून काँग्रेसच्या सीमा नितीन शिंदे यांनी १ हजार ३१२ मते तर ४ ब मधून काँग्रेसचे आबेद खान मोमीन खान यांनी १ हजार २७१ मते मिळवत विजय संपादन केला आहे.

प्रभाग क्रमांक ५ अ मधून अपक्ष गुलाबराव चंद्रभान सरदार यांनी ५०० मते तर ५ ब मधून भाजपच्या शोभा भागवत देसाई यांनी ४४६ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ६ अ मधून काँग्रेसच्या संध्या शाम राऊत यांनी २३२ मते तर ६ ब मधून शिवसेनेचे अक्षय नंदकुमार इंगळे यांनी १८९ मते मिळवत विजय मिळवला आहे.

Local Body Elections : बदललेल्या राजकीय समीकरणाचा भाजपला फायदा

प्रभाग क्रमांक ७ अ मधून काँग्रेसच्या वंदना अरुण जावळे यांनी ७१५ मते तर ७ ब मधून शिवसेनेचे मयुर रमेशचंद्रजी गोलेच्छा यांनी ४१८ मते मिळवून सदस्यपद पटकावले आहे. प्रभाग क्रमांक ८ अ मधून काँग्रेसच्या अनिकेत राजेश मापारी यांनी ४०० मते तर ८ ब मधून शिवसेनेच्या सुप्रिया गजानन मापारी यांनी ४२५ मते मिळवत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ९ अ मधून अपक्ष साहेबराव मारोती पवार यांनी ४८५ मते तर ९ ब मधून काँग्रेसच्या जुबेदा रमजान परसूवाले यांनी ७३६ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.

प्रभाग क्रमांक १० अ मधून अपक्ष पायल शुभम भगत यांनी ४८८ मते तर १० ब मधून काँग्रेसचे पंढरी पुंजाजी चाटे यांनी ४०९ मते मिळवून विजय संपादन केला आहे.