Local Body Elections : २१ वर्षांच्या मुलीने दिली अजित पवारांना मात

BSP’s Sanghmitra Chaudhary defeats the NCP Ajit Pawar : बारामतीत संघमित्रा चौधरीने वेधले महाराष्ट्राचे लक्ष

Baramati बारामती नगरपरिषद निवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का आणि नवा संदेश घेऊन आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा परंपरागत गड मानल्या जाणाऱ्या बारामतीतच महत्त्वाची उलथापालथ झाली आहे. बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले, मात्र त्यांची कन्या संघमित्रा चौधरी यांनी अवघ्या २१ व्या वर्षी दिग्गजांना पराभूत करून निवडणूक जिंकली.

या विजयामुळे जनता तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संघमित्रा चौधरी यांनी लक्षणीय मताधिक्याने विजय मिळवला असून, अजित पवारांच्या गडातच हा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या विजयामध्ये लक्ष्मण हाके यांनी दिलेली साथ निर्णायक ठरली आहे.

Fake currency case : मालेगाव बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संघमित्रा चौधरी यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यांनी या निवडणुकीत पदयात्रा काढून आणि सभा आयोजित करुन पार्श्वभूमी तयार केली. आता या विजयानंतर हाके यांनी संघमित्रा चौधरी यांचा उल्लेख “माझी कन्या” असा करत विजयाचा आनंदही साजरा केला आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी विजय प्राप्त करणे ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनी तरुण नेतृत्वाला पाठिंबा दिला असून, यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

बहुजन समाज पार्टीतर्फे काळुराम चौधरी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते तर त्यांची कन्या संघमित्रा चौधरी या प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढवत होत्या. पक्षाने दाखवलेला विश्वास त्यांनी खरा करुन दाखवला असून इतक्या तरुण वयात विजय संपादन केल्याने त्यांचे पुष्कळ कौतुक होत आहे.

Local Body Elections : निकालापूर्वीच पराभव झाल्याचा आला मेसेज

महायुतीने राज्यभरात स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला असला तरी बारामतीतील हा निकाल वेगळा संदेश देत आहे. या विजयातून तरुण नेतृत्वाचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. तसेच संघमित्रा चौधरी यांनी जनतेची सेवा करण्यासाठी, सामाजिक न्याय आणि विकास घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.