Zilla Parishad Elections : सिंदखेडराजात ‘काका–पुतणे’ पुन्हा आमनेसामने

Several parties face a battle for survival : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत इतर पक्षांसमोर अस्तित्वाची लढाई

Sindkhedraja सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या दोन नगरपालिका निवडणुकांनी स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळाली आणि विशेष म्हणजे दोन्ही नगरपालिकांवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला. फरक इतकाच— सिंदखेडराजा नगरपालिका राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे, तर देऊळगाव राजा नगरपालिका राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे काका–पुतणे दोघेही यशस्वी ठरले असून आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे लागले आहे.

या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांचे मनोबल वाढले असून, भाजप, काँग्रेस, उबाठा शिवसेना व शिंदेसेना यांच्यासाठी ही निवडणूक थेट अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

सिंदखेडराजा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरली आणि त्यांना यश मिळाले. शेवटपर्यंतची चुरस ही दोन्ही राष्ट्रवादी गटांतच पाहायला मिळाली. शिंदेसेना स्वतंत्र लढली; मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
देऊळगाव राजा नगरपालिकेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विजयी झाला. येथे शिंदेसेनेला अति-आत्मविश्वास नडल्याची चर्चा आहे. शिंदेसेनेत असताना उमेदवारी नाकारण्यात आलेल्या शिंपणे यांनी आमदार मनोज कायंदे यांच्याशी चर्चा करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आणि तेथूनच राजकीय वारे उलटे फिरल्याचे मानले जाते. राजकीय डावपेचात परागंत नसले तरी योग्य वेळी घेतलेला निर्णय निर्णायक ठरला, हे नाकारता येणार नाही.

Food and Drugs Department : निकृष्ट रेशन धान्यावर संताप; वाटप रोखून ३९४ क्विंटल ज्वारी परत

आता हेच डावपेच जिल्हा परिषद निवडणुकीतही खेळले जाण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांकडे लोकांचा ओघ असतो, हे वास्तव असले तरी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सत्ता नसतानाही कार्यकर्ते व समर्थकांची फळी भक्कम आहे, हेही तितकेच सत्य आहे. दोन्ही बाजूंना समाजाची ताकद आहे; मात्र कोणत्याही एका समाजाच्या बळावर निवडणूक जिंकता येईल, असा भ्रम घातक ठरू शकतो.

मराठा समाज संख्येने अग्रस्थानी असला तरी वंजारी, मागासवर्गीय, बंजारा, माळी तसेच अठरा पगड जातींची निर्णायक भूमिका राहणार आहे. अनेक गटांत अठरा पगड जातींचे मताधिक्य निकाल ठरवणारे ठरण्याची शक्यता आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात एकूण ११ जिल्हा परिषद गट आहेत— पाच सिंदखेडराजा, तीन देऊळगाव राजा, दोन चिखली आणि एक लोणार तालुक्यातील. यावेळी या गटांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे संकेत आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने साखरखेर्डा, शेंदुर्जन, दुसरबीड, बीबी, देऊळगाव मही हे गट जिंकले होते; भाजपने किनगाव राजा व शेलगाव आटोळ, काँग्रेसने सावखेडभाई व मेरा बु., अपक्षांनी सोनोशी, तर शिवसेनेने सिनगाव पांग्री येथे विजय मिळवला होता. त्या वेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे पाच गटांवर वर्चस्व होते आणि दोन्ही पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीची सत्ता होती.

पराभवानंतरही डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मतदारांशी संपर्क कायम ठेवला आहे. माजी आमदार तोताराम कायंदे हे सातत्याने जनतेच्या संपर्कात असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आता या चारही आजी-माजी आमदारांची खरी कसोटी जिल्हा परिषद निवडणुकीत लागणार आहे.

Navneet Rana Vs. Sanjay Khodke : ‘चादर चढवणाऱ्याच्या बाजूला आम्ही नाही!’

महायुती झाली तर जागावाटपाचे गणित कोणाच्या बाजूने झुकेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपने स्वबळावर लढत आपली ताकद दाखवावी, अशीही चर्चा आहे. शरद पवार राष्ट्रवादी (डॉ. राजेंद्र शिंगणे गट) अनेक गटांत सक्षम उमेदवारांसह सज्ज आहे. काँग्रेसकडे मात्र उमेदवारांची चाचपणी सुरू असून, वेळेवर उमेदवारी न मिळाल्यास कोलांट उड्या पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.