अमरावतीच्या सभेत विरोधक हतबल झाले असल्याचा टोला, लाडकी बहीण योजनेवरही भूमिका
Amravati विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘महायुतीचे डोळे गोट्या खेळण्याइतके सोपे नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, जनतेने वारंवार नाकारल्याने ते हतबल झाले आहेत, अशी टीकाही शिंदे यांनी केली.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे अमरावतीत आले होते. येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह सहा आमदार उपस्थित होते.
‘एसआयटी लावूनच दाखवा, पळता भुई थोडी होईल’; बावनकुळेंना काँग्रेसचे आव्हान!
सरकार बदलणे हे जनतेच्या हातात असून, जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कायम सुरू राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी विरोधकांवर केलेल्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.








