Deputy Chief Minister Ajit Pawar Targets BJP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निशाणा कोणत्या पक्षावर?
Pune पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुण्याचे प्रशासन गेल्या काही वर्षांत शहराचा विकास रोखण्यात अपयशी ठरले आहे. भाजपच्या कारभारामुळे पुणे शहराची दुर्दशा झाली असून, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा याकडे दुर्लक्ष झाले आहे.
पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण, गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारसभेत रविवारी सायंकाळी अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “पुण्यात ११३० कोटी रुपये निधी दिला. पण त्याचा योग्य वापर झाला नाही. पालिकेने फक्त ६५८ कोटी रुपये खर्च केले. रस्त्याचे कामही पूर्ण झाले नाही. याला जबाबदार कोण? केंद्र आणि राज्य सरकार चांगले काम करतेय. पण पुण्याचे कारभारी शहराची वाट लावतायत.” असं म्हणत त्यांनी पुण्यातील भाजप पदाधिकार्यांवर निशाणा साधला.
Nitesh Rane : ठाकरेंची सत्ता आल्यास मराठी शाळा बंद होऊन ऊर्दू शाळा सुरु होतील
तसेच त्यांनी शहरातील कोयता गॅंगचा संपूर्ण नायनाट केला जाईल. “मी कुणालाही वार्यावर सोडणार नाही. पुढील पाच वर्षांसाठी सुरक्षित हाती महापालिका देण्यासाथी ही निवडणूक आहे.” असेही पवार म्हणाले. भाजपच्या कारभारावर टीका केली. रस्त्यांची दुर्दशा, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठ्याची समस्या आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.
अजित पवारांवर गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचे आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी कोयता गॅंगचा केलेला उल्लेख अतिशय महत्त्वाचा ठरतो. कोयता गॅंगचे नाव उच्चारुन त्यांनी पुण्यातून गुंडगिरीचा नायनाट करण्याचे वचन दिले आहे. आता पाहायचे आहे की नागरिक या वचनाला कसा प्रतिसाद देतात.








