व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपला पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केला

Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपला पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केला

Raj Thackeray Has Surrendered His Party to Uddhav Thackeray, Alleges Santosh Dhuri : संतोष धुरींनी काढली भडास; भाजप प्रवेशानंतर केली टिका

Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात नवे घडामोडी घडत आहेत. मनसेचे माजी नेते संतोष धुरी यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक पातळीवर बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. धुरी यांनी पक्षप्रवेशानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला राजकीय रंग चढला आहे.

संतोष धुरी हे मनसेत सक्रिय होते आणि स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव होता. मात्र गेल्या काही काळापासून ते पक्षापासून दूर झाले होते. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली भूमिका स्पष्ट केली. धुरी यांनी सांगितले की, “ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला अशा जागा दिल्यात जिथे ठाकरेंकडे उमेदवार नव्हते किंवा त्यांचे विद्यमान नगरसेवक बदनाम होते, त्या जागा मनसेच्या माथी मारण्यात आल्या. जिथे मनसेची ताकद होती, तिथली जागा आम्हाला दिली नाही.”

Santosh Dhuri : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलं काय?

ते पुढे म्हणाले की, “मला महापालिकेसाठी उमेदवारी दिली नाही म्हणून पक्ष सोडला नाही. तर माझी खदखद आहे. मनसेच्या जागाही ठाकरे गटाला देण्यात आल्या. दादर, लालबाग, शिवडी, भांडूप या मराठी भागात आम्हाला एकच जागा दिली.”

Collector of Jalgao Jamod : मुख्याधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेविरोधात नगरसेवकांचा तीव्र निषेध

संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरेंच्या धोरणावरही टिका केली. ते म्हणाले, राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर केला. उद्धव ठाकरेंनी सूत्र हाती घेतल्यावर बाळासाहेबांचे शिलेदार दूर गेले, त्याचप्रकारे आता राज ठाकरेंचे शिलेदार दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे हे तहात हरले आहे. त्यांनी शिवसेनेसमोर शरणागती घेतली. संजय राऊत, अनिल परबांसमोर शरणागती पत्करली आहे.”

संतोष धुरी यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर भाजपला बळ मिळणार आहे. मनसेतून बाहेर पडलेले नेते भाजपमध्ये सामील होत असल्यामुळे मनसेची ताकद कमी होत आहे. राज ठाकरे यांच्यावर टीका करून धुरी यांनी स्पष्ट केले की, मनसेला भविष्यात मोठे यश मिळणे कठीण आहे.

error: Content is protected !!