BJP Malkapur : पराभूत उमेदवारांना सक्रीय राहण्यासाठी नेत्यांचे साकडे

Leaders appeal to defeated candidates to remain active : मलकापुरात भाजपची संघटनात्मक बांधणी; विशेष बैठकीत आवाहन

Malkapur नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीने आता संघटनात्मक फेरबदलांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला, तर दुसरीकडे पराभूत उमेदवारांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनी या बैठकीचे नेतृत्व केले.

निवडणुकीत यश मिळवलेल्या उमेदवारांनी जनसेवेवर लक्ष केंद्रित करावे, तर पराभूत उमेदवारांनी खचून न जाता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असा सूर या बैठकीत उमटला. “भाजप हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष असून, पराभूत उमेदवारांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे,” असे स्पष्ट करत आगामी राजकीय आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Hidayat Patel : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर हत्या

पक्षाची शहरातील पकड अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीत काही महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शे. इम्रान शे. अजीज यांची भाजप शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महेश वाघ यांच्याकडे कामगार आघाडीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या नियुक्त्यांद्वारे अल्पसंख्याक आणि कामगार अशा दोन्ही वर्गांत पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

Shweta Mahale : ‘चूक खपवून घेतली जाणार नाही’, शुभारंभालाच आमदारांचा इशारा

या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मोहन शर्मा, संजय काजळे, मिलिंद डवले, यश संचेती, संतोष बोंबटकर, शिवराज जाधव, दुर्गेश राजापुरे, सोनाजी खर्चे, विशाल मधवानी, हेमंत रिंढे, शिरीष डोरले यांच्यासह तालुका व शहर स्तरावरील कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या बैठकीमुळे मलकापूर भाजपमध्ये निवडणुकीनंतर आलेली मरगळ झटकून नव्या उत्साहाने कामाला सुरुवात झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नवनियुक्त पदाधिकारी आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या समन्वयावरच आगामी काळातील पक्षाची वाटचाल अवलंबून असणार आहे.