Dy-CM Promises Massive Funds for Akola : अकोल्याच्या पाणीप्रश्नावरून विरोधकांवर तोफ; शिवसेनेच्या स्वतंत्र ‘वचननाम्याचे’ लोकार्पण
Akola “अकोला शहराला सुंदर आणि विकसित बनवणे हे आमचे स्वप्न आहे. जर अकोलेकरांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला संपूर्ण सत्ता दिली, तर शहराच्या विकासासाठी निधी आणि इच्छाशक्ती दोन्ही कमी पडू देणार नाही,” असे ठाम अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. जुन्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित शिवसेनेच्या भव्य प्रचार सभेत ते बोलत होते.
‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख आणि विकासाचा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा पाढा वाचला. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत त्यांनी महिला मतदारांना साद घातली. “अकोल्यात शिवसेनेच्या हाती सत्ता सोपवा, शहराच्या प्रगतीची उर्वरित काळजी तुमचा हा भाऊ घेईल,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
PMC election: पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले तब्बल ६० उमेदवार रिंगणात
शिवसेनेच्या स्वतंत्र ‘वचननाम्याचे’ लोकार्पण यावेळी अकोला शहरासाठी शिवसेनेच्या स्वतंत्र वचननाम्याचे (Manifesto) लोकार्पण करण्यात आले. “नगरविकास खाते सांभाळताना मी अकोल्यासाठी नेहमीच निधी दिला आहे. आता योजनाबद्ध विकासासाठी सक्षम टीम सज्ज आहे,” असे शिंदे म्हणाले. “ज्यांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगली, त्यांना नागरिकांना नियमित पिण्याचे पाणीही देता आले नाही, ते शहराचा काय विकास करणार?” असा टोला त्यांनी नाव न घेता स्थानिक विरोधकांना लगावला.
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर अकोटमधील भाजप-एमआयएम आघाडी तुटली
“आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. जे बोलतो ते जिद्दीने करून दाखवतो,” असे सांगत त्यांनी अकोलेकरांना एकदा शिवसेनेला सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. अकोल्याच्या प्राथमिक समस्यांची पूर्ण जाणीव असून परिवर्तनासाठी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.








