Entry through Nomination in Mehkar Council : कासम गवळी, अजय उमाळकर, ॲड. आकाश घोडे होणार स्वीकृत नगरसेवक; मो. अलीम उपाध्यक्षपदी?
Mehkar नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीमुळे मेहकरचे राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनतेने नाकारलेले उमेदवार आता ‘स्वीकृत’ सदस्य म्हणून थेट सभागृहात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. १३ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडीत हे सर्व अनपेक्षित ‘ट्विस्ट’ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
नगरपालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या काँग्रेसकडे उपाध्यक्षपद जाणे निश्चित मानले जात आहे. ज्येष्ठ नेते कासमभाई गवळी हे आपले विश्वासू सहकारी आणि गटनेते मो. अलीम मो. ताहेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची चिन्हे आहेत. मुजीब कुरेशी यांचे नाव चर्चेत असले तरी, पारडे मो. अलीम यांच्या बाजूनेच झुकलेले आहे.
Administrative Action : तक्रारींची दखल न घेणे भोवले; विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो-कॉज’ नोटीस!
संख्याबळानुसार काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) यांच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येणार आहे. यामध्ये पक्षांनी आपल्या निष्ठावान आणि पराभूत नेत्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे:
काँग्रेस – कासमभाई गवळी (माजी नगराध्यक्ष; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत)
शिवसेना – अजय उमाळकर (अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार)
शिवसेना (उबाठा) – ॲड. आकाश घोडे (नगराध्यक्ष किशोर गारोळे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी)
विशेष म्हणजे शिवसेनेकडून ललित इनानी आणि उबाठाकडून अमर घोडे यांनी स्वीकृत पदासाठी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवले होते. मात्र, ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली असून अजय उमाळकर आणि ॲड. आकाश घोडे यांची वर्णी लागणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
Local Body Elections : काँग्रेसकडे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी (अजित पवार)च्या दावणीला!
पराभूत उमेदवारांना ‘मागच्या दाराने’ सभागृहात पाठवण्यामागे पक्षीय नेतृत्वाचे मोठे राजकीय गणित आहे. आपली टीम शाबूत ठेवणे आणि सत्ताधारी गटावर सभागृहात वचक निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे. १३ जानेवारीच्या निवडीनंतर मेहकर नगरपालिकेत नवे ‘सत्ताकेंद्र’ उभे राहणार की अंतर्गत कलह उफाळून येणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.








