Amravati Municipal Corporation : जिथे वायएसपीला जागा, तिथे आता अपक्षांना पाठिंबा

BJP snaps political ties with the Yuva Swabhiman Party : भाजपाने युवा स्वाभिमान पक्षाशी राजकीय संबंध पूर्णतः तोडले

Amravati महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पक्ष (वायएसपी) यांच्यातील राजकीय समन्वय अखेर पूर्णतः संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या प्रभागांमध्ये यापूर्वी भाजपाने युवा स्वाभिमान पक्षासाठी जागा सोडल्या होत्या, त्या ठिकाणी आता भाजपाकडून थेट अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपाने युवा स्वाभिमान पक्षाशी असलेले सर्व राजकीय संबंध तोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

अधिकृत घोषणा नसली तरी भाजपाच्या कोणत्याही प्रमुख नेत्यांच्या भाषणात किंवा प्रचारात युवा स्वाभिमान पक्षाचा उल्लेख होत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रचार सभांमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणातही वायएसपीचा एकदाही उल्लेख न झाल्याने भाजपाची भूमिका अधिक ठळक झाली आहे. यावरून भाजपाने जाणीवपूर्वक युवा स्वाभिमान पक्षापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत.

Local Body Elections : न. प. निवडणुकीत मतदारांची उघड नाराजी

अमरावतीतील अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी स्थानिक भाजप नेत्यांनी उघडपणे अपक्ष उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केल्याचेही दिसून येत आहे. याउलट, युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांकडे भाजपाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

ज्या प्रभागांमध्ये यापूर्वी वायएसपीसाठी जागा सोडण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी आता अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यात येत आहे. भाजपाच्या सभांमध्ये वायएसपीचा उल्लेख पूर्णतः टाळण्यात येत असून, मंत्री बावनकुळे यांच्या प्रचार भाषणातही वायएसपीचा संदर्भ आढळलेला नाही. भाजप पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारांचा उघड प्रचार होत असल्याने भाजप–वायएसपी युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकपदी भूषण व संतोष मापारींची दाट शक्यता

राजकीय विश्लेषकांच्या मते, काही प्रभागांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाने भाजपाच्या उमेदवारांविरोधात भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांतील संबंध अधिक ताणले गेले. परिणामी, भाजपाने कोणताही संभ्रम न ठेवता युवा स्वाभिमान पक्षाशी असलेले राजकीय नाते पूर्णतः तोडण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींचा थेट परिणाम अमरावती महापालिका निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर होणार असून, अनेक प्रभागांतील लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.