व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amravati Municipal Corporation Election : स्थलांतरित मतदारांचा शोध; उमेदवारांची प्रचार यंत्रणा सक्रिय

Amravati Municipal Corporation Election : स्थलांतरित मतदारांचा शोध; उमेदवारांची प्रचार यंत्रणा सक्रिय

Drive to trace migrant voters : मतदानापूर्वीच आखणी; निकटवर्तीयांवर जबाबदारी

Amravati महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची प्रचार यंत्रणा वेगाने सक्रिय झाली आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः परगावी गेलेले, नोकरीच्या बदलीमुळे स्थलांतरित झालेले तसेच घर बदलून दुसऱ्या प्रभागात गेलेले मतदार शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.

अमरावती शहरातील अनेक मतदार शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणांमुळे सध्या पुणे तसेच इतर शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांची नावे अद्यापही संबंधित प्रभागांच्या मतदार यादीत कायम आहेत. असे मतदार प्रत्यक्ष मतदानासाठी शहरात येतील की नाही, याबाबत उमेदवारांमध्ये अनिश्चितता आहे.

शासकीय व खासगी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे अनेक मतदारांनी शहर सोडले असून, काहींनी नव्या वसाहतींमध्ये घरे घेतली आहेत. परिणामी, दिलेल्या पत्त्यावर मतदार सापडत नसल्याने प्रचार यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. मतदार याद्यांच्या आधारे उमेदवार व कार्यकर्ते घरोघरी भेटी देत असून, ‘घर बंद आहे’ किंवा ‘येथून सहा महिन्यांपूर्वी स्थलांतर झाले’ अशा प्रतिक्रिया वारंवार मिळत आहेत.

Akola Municipal Corporation Election : अकोल्यात महिलांनी साड्या फाडून केली होळी

काही उमेदवार सोशल मीडियाचा वापर, फोन कॉल्स तसेच ओळखींच्या माध्यमातून परगावी असलेल्या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदानाच्या दिवशी शहरात येऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांना करण्यात येत आहे. अनेक प्रभागांमध्ये स्थलांतरित मतदारांचे मतदान सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आली असून, वाहने व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जात आहे.

स्थलांतरित व बदली झालेले मतदार प्रत्यक्ष मतदानासाठी येतील की नाही, यावरच अनेक उमेदवारांचे विजय-पराजयाचे गणित अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अशा मतदारांना मतदानासाठी आणण्याचा निर्धार उमेदवार व राजकीय पक्षांनी केला आहे.

Nashik Municipal Corporation Election : नाशिकमध्ये भाजपचं मोठं ‘ऑपरेशन’; माजी महापौरांसह ५४ बंडाखोर नेत्यांची हकालपट्टी

घराघरांत संपर्क मोहिमेसोबतच गठ्ठा मतदान करणारे घटक, कुटुंबे व समाजघटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यांच्याशी थेट संवाद साधला जात असून, सायंकाळनंतर कोपरा सभांमुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने निवडणूक वातावरण तापले आहे.

रात्रीच्या बैठकांमधून प्रचाराची रणनीती आखली जात असून, नाराज गटांच्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतधरणी, मतदानाच्या दिवशीचे सूक्ष्म नियोजन तसेच बाहेरगावातील मतदारांसाठी वाहतूक व अन्य व्यवस्थेवर भर दिला जात आहे.

error: Content is protected !!