BJP Emerges as the Largest Party in Akola : जुळवाजुळव करण्यासाठी सारेच सरसावले, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर
Akola अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ८० जागांच्या सभागृहात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत आघाडी घेतली आहे.
अंतिम निकालानुसार, भारतीय जनता पक्षाला एकूण ३८ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्ष २१ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (उद्धवसेना) ६ जागा मिळाल्या आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने ५ जागांवर यश मिळवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि एमआयएम या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले आहे.
Election results 2026 : मुंबईसह राज्यातील महापालिकांवर भाजपचा झेंडा
याशिवाय, १ अपक्ष उमेदवार निवडून आला असून, ‘महानगर विकास समिती’ या स्थानिक आघाडीनेही १ जागा जिंकली आहे.
या निकालामुळे अकोला महापालिकेत सत्तास्थापनेसाठी पक्षीय गणिते व संभाव्य युतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पष्ट बहुमताच्या अभावामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, महापौरपद आणि स्थायी समितीवर कोणाचा वरचष्मा राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.








