Effect of the establishment of the new Bhatkuli APMC : डीडीआर यांची अधिसूचना जारी : नव्याने भातकुली एपीएमसी स्थापन झाल्याचा परिणाम
Amravati राज्यात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याच्या १७ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीनुसार अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती गठित करण्यात आली. या निर्णयामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली असून, अमरावती व भातकुली दोन्ही बाजार समित्यांवर शासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) शंकर कुंभार यांनी २२ जानेवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार हा निर्णय अंमलात आणण्यात आला. अमरावती बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावे नव्याने स्थापन झालेल्या भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
Chandrashekhar Bawankule : अंतर्गत वादावर पडदा! पालकमंत्री आज नगरसेवकांसोबत करणार वन-टू-वन चर्चा
भातकुली स्वतंत्र बाजार समिती झाल्याने त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता थेट स्थानिक पातळीवर शेतमाल विक्री करता येणार असून, वाहतूक खर्चात बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. अमरावती बाजार समितीचे सभापती व पदाधिकाऱ्यांना या निर्णयाची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने शुक्रवारी एकच गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्याच्या राजकारणासह सहकार क्षेत्रातही या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अमरावती बाजार समितीविरोधात सातत्याने तक्रारी करून चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आणि अखेर कोणतीही पूर्वसूचना न देता समिती बरखास्त करून सहकाराचा गळा घोटण्यात आल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत आहे.
बाजार समित्यांच्या निवडणुका होईपर्यंत संपूर्ण कारभार प्रशासकांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. शेतमाल लिलाव, बाजार शुल्क वसुली, व्यापारी नोंदणी, सुविधा विकास तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण ही सर्व जबाबदारी प्रशासकांकडे असणार आहे. व्यापाऱ्यांना कार्यक्षेत्रानुसार परवाने व नोंदणी प्रक्रियेत आवश्यक बदल करावे लागणार आहेत. हा निर्णय शेतकरीहिताचा असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
Mumbai Political Shift : सहर शेख यांचा उदय आणि आव्हाडांच्या ‘बालेकिल्ल्या’ला भगदाड!
बदल का करण्यात आला?
बाजार समित्यांचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी
शेतकऱ्यांना जवळच्या बाजारात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
प्रशासकीय अडचणी व तक्रारी कमी करण्यासाठी
हे आहे प्रशासक मंडळ
अमरावती बाजार समिती :
प्रशासक प्रमुख : सुधीर खंबायत (उपनिबंधक, अमरावती)
सदस्य : अविनाश महल्ले (सहकार अधिकारी)
सदस्य : प्रशांत गुल्हाने (लेखापरीक्षक)
भातकुली बाजार समिती :
प्रशासक प्रमुख : अजहर खान सत्तार खान (सहकार अधिकारी)
सदस्य : ज्ञानेश्वर जगताप (लेखापरीक्षक)
बाजार समितीनिहाय उपबाजार
अमरावती बाजार समिती :
फळे व भाजीपाला आवार, बडनेरा उपबाजार (धान्य), बडनेरा गुरांचा बाजार, शिराळा उपबाजार, भाजीपाला उपबाजार (भातकुली रोड), माहुली जहाँगीर उपबाजार (कार्यक्षेत्र – अमरावती तालुका)
भातकुली बाजार समिती :
भातकुली, आष्टी व खोलापूर उपबाजार (कार्यक्षेत्र – भातकुली तालुका)
येथील कर्मचारी वर्ग, स्थावर व जंगम मालमत्ता तसेच ताळेबंद भातकुली बाजार समितीकडे वर्ग करण्यात आला आहे.








