Latur Political Analysis : औशाच्या रणांगणात ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; भाजपची रणनीती यशस्वी?

Senior leader from Shiv Sena (Thackeray faction) joins the BJP : विलासरावांच्या काळात औशात भगवा फडकवणारे दिनकर माने आता कमळाच्या गोटात

Latur लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून दिनकर माने Dinkar Mane यांच्या भोवती फिरत राहिले आहे. एकेकाळी दिवंगत विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh यांच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव करून देणारे माने आता भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. ही केवळ एक पक्षबदलाची घटना नसून, लातूरच्या बदलत्या सत्तासमीकरणांचे संकेत आहेत.

१९९९ आणि २००४ मध्ये जेव्हा काँग्रेसची मोठी ताकद होती, तेव्हा दिनकर माने यांनी शिवसेनेच्या माध्यमातून औशात विजय मिळवला होता. ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी घेतलेला भाजप प्रवेशाचा निर्णय हा ‘अस्तित्वाची लढाई’ म्हणून पाहिला जात आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे, कारण औशात त्यांच्याकडे आता कोणताही प्रबळ स्थानिक चेहरा उरलेला नाही.

E-Governance : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे निकाल जाहीर

आमदार अभिमन्यू पवार Abhimanyu Pawar यांनी मागील पाच-सहा वर्षांत औशात आपली पकड मजबूत केली आहे. दिनकर मानेंना पक्षात घेऊन त्यांनी दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. मतदारसंघातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आता आपल्याच पक्षात आल्याने पवारांना विधानसभा स्तरावर मोठं आव्हान उरलेलं नाही. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मानेंच्या अनुभवाचा आणि कार्यकर्त्यांच्या जाळ्याचा फायदा भाजपला लातूरमध्ये ‘क्लीन स्वीप’ देण्यासाठी होऊ शकतो.

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या युतीचे पडसाद लातूरमध्येही उमटले आहेत. दिनकर मानेंचा भाजप प्रवेश याच काळात झाल्याने ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. ५३ जागांच्या फॉर्म्युल्यामुळे स्थानिक स्तरावर मनसे आणि उबाठा गटात म्हणावा तसा समन्वय दिसत नाहीये. माने यांच्या जाण्याने औशात शिवसेनेचा जुना ‘ग्राऊंड कनेक्ट’ तुटला आहे.

Maharashtra politics : भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू !

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, औसा नगरपालिकेत नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला केवळ ६ जागा मिळाल्या आहेत. भाजपमध्ये दिनकर मानेंचा प्रवेश झाल्याने आता महायुतीमध्ये ‘वर्चस्व कुणाचे?’ असा वाद उफाळण्याची शक्यता आहे. भाजपचे अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते यांच्यातील अंतर्गत स्पर्धा आता अधिक तीव्र होणार आहे.