State Election Commission announce final decision : राज्य निवडणूक आयोग अंतिम निर्णय जाहीर करणार
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे राज्य शोक सागरात बुडाले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका वेळेत होणार का याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात निवडणूक पुढे ढकलण्या संदर्भातील अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र राज्य निवडणूक आयोग यावर आज अधिकृत अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या 12 जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकींचा प्रचार सुरू असतानाच हा अपघात घडल्यामुळे राजकीय क्षेत्रात भावनिक वातावरण तयार झाले आहे. यातच तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे कोणत्याही मोठ्या सभा होणार नाहीत. तसेच काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रचार प्रचाराची दिशा बदलण्याची शक्यता ही समोर आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका नियोजित जाहीर कार्यक्रमाप्रमाणेच होणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र त्याबद्दल निवडणूक आयोग किंवा अधिकृत स्त्रोतांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
मात्र राज्य निवडणूक आयोग या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित बाबी जसे की, प्रचारासाठी उपलब्ध कालावधी, प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था या संदर्भातील तयारी याचा सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वसाधारणपणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन ते चार दिवसाचा कालावधी दिला जातो मात्र यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार तो सात दिवसाचा कालावधी उमेदवारांना उपलब्ध झाला. त्यानुसार 3 फेब्रुवारी पर्यंत प्रचार करता येणार आहे.
Ajit Pawar death news : राजकारणातला दिलदार विरोधक आणि शब्दाला पक्का सहकारी हरपला
मात्र राज्यात सध्या विमान अपघाताची दुर्दैवी घटना आणि अजित पवारांचा मृत्यू या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वातावरण बदलले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार वेग धरत असतानाच राज्यात असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या राजकारणात अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग लवकरच सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्व पैलूंवर विचार करून आपला अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे व्यक्त केली जात आहे.








