Ajit pawar death : अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे? पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली

NCP leadership may pass to Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत; राजकीय वारसा जपण्यासाठी पक्षाची नवी रणनीती

Mumbai उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक आणि चटका लावून जाणाऱ्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर (अजित पवार गट) आता नेतृत्वाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडवण्यासाठी आणि पक्षाला स्थिरता देण्यासाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते सुरू झाली आहेत. आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि भविष्यातील राजकीय समीकरणे पाहता, सुनेत्रा पवार यांना सक्रिय राजकारणात आघाडीवर आणण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला राखणे हे राष्ट्रवादीसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी, अशी मागणी लावून धरली आहे. काही वरिष्ठ नेत्यांच्या मते, पक्षात आणि सत्तेत अजितदादांनी निर्माण केलेले राजकीय संतुलन टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना केवळ आमदारच नव्हे, तर मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद किंवा उपमुख्यमंत्रिपदासाठीही विचार व्हावा, अशी चर्चा पडद्यामागे सुरू आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट फोन’; प्रशासन लागले कामाला !

सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. जर त्यांनी राजीनामा देऊन बारामती विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला, तर त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त होईल. या जागेवर अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात एक मत प्रवाह आहे. पार्थ पवार यांनी यापूर्वी लोकसभा लढवली होती, मात्र आता त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याचा विचार कोअर कमिटी करत असल्याचे समजते.

state health index : आरोग्य निर्देशांकात जिल्हा शून्य; राज्यात शेवटून पाचवा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे:
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी.
पार्थ पवार यांची राज्यसभेवरील वर्णी.
विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची.

अजितदादांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा वेळी पवार कुटुंबातील सदस्यानेच नेतृत्वाची धुरा सांभाळल्यास कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि सहानुभूतीचा लाभही पक्षाला मिळू शकेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ही निवडणूक केवळ जागा टिकवण्यासाठी नसून अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.