Baramati by election : अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी सुरू

ajit-pawar-baramati-by-election-special-voter-list-election-commission : निवडणूक आयोगाकडून विशेष मतदारयादी पुनरीक्षणाचा निर्णय

Mumbai: अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदणीकृत असलेले मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतील.

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाल्याने नियमानुसार पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अंतर्गत हा विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, मतदारयादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्याचा उद्देश आयोगाने स्पष्ट केला आहे.

Mayoral election : मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड

निवडणूक आयोगाच्या जाहीर कार्यक्रमानुसार बारामती विधानसभा मतदारसंघाची एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत.

संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवार 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्याच यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

india Us Trade Deal : ३० ट्रिलियन डॉलरचा अमेरिकी बाजार भारतासाठी खुला!

या बैठकीत राजकीय पक्षांना संपूर्ण पुनरीक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, मतदान केंद्रांची यादी, मतदारयादी सुधारणा आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना व अभिप्रायांचे आदानप्रदान केले जाणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.